IND vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंडमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याही ऋषभ पंत आपली कमाल दाखवू शकला नाही. मागील काही सामन्यांमधील पंतची फलंदाजी पाहता तो सध्या अत्यंत वाईट फॉर्ममध्ये आहे असं म्हणणं उचित ठरेल. मागील ११ पैकी १० सामन्यांमध्ये पंत उत्तम खेळू शकलेला नाही. मात्र अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय सामन्यात अपयशी ठरलेला पंत हा एकमेव खेळाडू नाही. यापूर्वी भारतीय संघातील अनेक मातब्बरांना याच वाईट फॉर्मचा सामना करावा लागला होता. अलीकडच्या काळात माजी कर्णधार विराट कोहलीनेही हा अनुभव घेतला आहे. यापूर्वी टीम इंडियाचा माजी तुफानी फलंदाज विरेंद्र सेहवागला सुद्धा अशाच प्रकारे फॉर्म गवसला नव्हता. अनेक भारतीय खेळाडूंच्या मते पंत व सेहवाग यांच्या खेळण्याची शैली पाहता हे दोघे समान धाटणीचे खेळाडू वाटतात पण ही तुलना करणं पंतला मात्र अजिबात आवडलेले नाही.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या अगोदर ऋषभ पंत याला क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी सेहवागचे उदाहरण देत एक प्रश्न केला होता. टी २० क्रिकेट व कसोटी क्रिकेट यांमधील खेळाच्या रेकॉर्डवरून विचारलेल्या या प्रश्नावर पंत भलताच वैतागला होता. २५ वर्षीय रिषभ पंतने यावेळी हर्ष भोगले यांना कठोर शब्दात सुनावण्याचाही प्रयत्न केला. हर्षा भोगले म्हणाले की, मी सेहवागला याआधी प्रश्न केला होता, तुला बघूनही असं वाटतं की तू टी २० मध्ये उत्तम खेळशील पण तुझा टेस्ट रेकॉर्ड त्याहून चांगला आहे.
हर्षा भोगले यांच्या प्रश्नाला ऋषभ पंतने काहीसा अनपेक्षित प्रतिसाद देत म्हंटले की, सर एक तर रेकॉर्ड फक्त नंबर आहे आणि दुसरं म्हणजे माझा टी २० रेकॉर्ड सुद्धा उत्तमच आहे. या प्रतिक्रियेने हर्षा भोगले सुद्धा थोडे गोंधळून गेले व त्यांनी पुढे सावरून घेत म्हंटल की, मी खराब नाही म्हणणार फक्त टेस्ट रेकॉर्डशी तुलना करत आहे. यावरूनही पुन्हा पंतने उत्तर दिले की, तुलना करणे हा तसाही माझ्या आयुष्याचा भाग नाही, मी आता २४- २५ वर्षाचा आहे, जेव्हा ३०-३२ वर्षाचा होईन तेव्हा तुलना करा आता तर या तुलनेला काही लॉजिकच नाही.
अन हर्ष भोंगलेंवर चिडला रिषभ पंत..
ऋषभ पंतचे टी २०, ODI रेकॉर्ड्स
आकडेवारी पाहिल्यास केवळ 31 कसोटींमध्ये, पंतने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत उत्तम खेळी दाखवली आहेत. ४३ च्या सरासरीने व ७२ च्या स्ट्राइक रेटने खेळताना पंतने आयत्या वेळी अनेक सामने पालटले आहेत. पंतने नमूद केल्याप्रमाणे, त्याचे एकदिवसीय रेकॉर्ड्स नक्कीच वाईट नाहीत, या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये नाबाद शतक झळकावून पंतने भारताला सामना जिंकवून दिला होता. तर टी २० मध्ये सुद्धा १२६ च्या स्ट्राईक रेटने त्याने उत्तम खेळ दाखवला आहे.
हे ही वाचा<< “जर मी आक्रमक झालो तर त्याला..”, IND vs NZ आधी अर्शदीप सिंगचं उमरान मलिकबाबत मोठं विधान
सध्या प्रभावी खेळी दाखवण्यासाठी आपल्याला संधी मिळत नाही जेव्हा एकदिवसीय सामन्यांमध्ये किंवा कसोटीमध्ये ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला खेळाडू येतो तेव्हा तुम्हाला संघाची गरज पाहून फलंदाजी करावी लागते, जेव्हा टॉप ऑर्डरमध्ये स्थान मिळेल तेव्हा तुम्हाला स्वतःसाठी खेळता येते असेही पंत म्हणाला.