ऋषभ पंतला मर्यादित सामन्यांच्या क्रिकेटमध्ये कितीही संधी मिळत असल्या तरी मोठी खेळी करण्याच्या आघाडीवर तो बहुतांश सामन्यांमध्ये अपयशी ठरत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० मालिकेत आणि नंतर एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात तो फलंदाजीत अपयशी ठरला, तर टी२० विश्वचषकातील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याला संधी देण्यात आली, जिथे तो कामगिरी करू शकला नाही. पंतच्या सततच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाच्या माजी सलामीवीर फलंदाजानेही काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला त्याला दिला होता.

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील टीम इंडियाला त्याची गरज असताना त्याने खराब फटका मारून विकेट दिली. त्या फटक्याची त्यावेळी अजिबातच गरज नव्हती. सलामीवीर शिखर धवन आणि शुबमन गिल हे दोघेही स्वस्तात तंबूत परतले होते. अशावेळी खेळपट्टीवर टिकून राहणे अधिक महत्त्वाचे असते. त्याने १६ चेंडूत फक्त १० धावा केल्या. एका बाजूला श्रेयस अय्यर चांगली फलंदाजी करत त्याला साथ देण्याएवजी स्वतः निष्काळजीपणे फटका मारून विकेट दिल्याने सर्वांना संजू सॅमसनचे पुन्हा स्मरण झाले. त्याने पहिल्या सामन्यात अय्यरला साथ देत भारताला ३००चा आकडा पार करण्यात मदत केली होती. अशा परिस्थितीत आता संजू सॅमसनला संघात घेण्यासाठी संघ व्यवस्थापनावर दबाव वाढत चालला आहे.

operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Today is death anniversary of Nani Palkhiwala who secured fundamental rights in Kesavanand Bharti case
स्मरण एका महान विधिज्ञाचे…
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताची अवस्था सध्या बिकट आहे. नाणेफेक जिंकून यजमानांनी टीम इंडियाला फलंदाजीला आमंत्रित केले. मात्र सलामीवीर शिखर धवन (२८) आणि शुबमन गिल (१३) फारशी काही चांगली कामगिरी करू शकले नाही. श्रेयस अय्यर एका बाजूने खिंड लढवत असताना त्याची झुंज देखील अपयशी ठरली. त्याने ५९ चेंडूत ४९ धावा केल्या तर मिस्टर ३६० सूर्यकुमार यादव देखील अवघ्या ५ धावा करून बाद झाला. सध्या अष्टपैलू दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदर भारतासाठी किल्ला लढवत आहेत.  

हेही वाचा :   IND vs NZ 3rd ODI: न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय, संजू सॅमसनला पुन्हा वगळले

तत्पूर्वी, न्यूझीलंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. यामधीलच एक नाव म्हणजे संजू सॅमसन. सॅमसनने मालिकेतील पहिला सामना खेळला मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. एक अतिरिक्त गोलंदाज असावा म्हणून आम्ही संजू सॅमसनला दुसऱ्या सामन्यात खेळवले नाही असे कर्णधार शिखर धवनने सांगितले होते.

Story img Loader