Rohit Sharma Century: रोहित शर्माने आज न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात झंझावाती शतक झळकावले आहे. रोहितच्या शतकानंतर अनेक विक्रम झाले आणि अनेक विक्रम मोडले गेले. मात्र या शतकासह भारतीय क्रिकेटचा मोठा इतिहास रचला गेला आहे. रोहित शर्माने तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शतक झळकावले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज रोहित शर्मा सुरुवातीपासूनच लयीत दिसला, रोहितने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. त्याने ८५ चेंडूचा सामना करताना, ९ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या. त्याचबरोबर रोहित शर्माला आज सलामी फलंदाज १० वर्षदेखील पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर युवा फलंदाज शुबमन गिलदेखील ७८ चेंडूत १३ चौकार आणि ५ षटकार लगावत ११२ धावा केल्या.

वनडे क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांचे वर्चस्व –

न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावताच रोहित शर्माने आपल्या वनडे कारकिर्दीतील ३० वे शतक पूर्ण केले. त्यानंतर रोहित शर्मा सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यानंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग असला तरी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३० शतके झळकावली आहेत.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे खेळाडू –

१. सचिन तेंडुलकर – ४९
२. विराट कोहली – ४६
३. रोहित शर्मा – ३०
४. रिकी पाँटिंग – ३०
५. सनथ जयसूर्या – २८

हेही वाचा – IND vs NZ 3rd ODI: रोहित शर्मासाठी आजचा दिवस खूपच स्पेशल; १० वर्षापूर्वी ‘या’ खास इनिंगला केली होती सुरुवात

सर्वाधिक शतके करणाऱ्यांमध्ये भारतीय –

सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या यादीत भारतीय फलंदाज अव्वल स्थानी आहे. सचिन तेंडुलकरने वनडेमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. त्यानंतरत विराट कोहलीने ४६ शतके झळकावली आहेत. आता यादीत रोहित शर्मा ३० शतकांसह सामील झाला आहे. त्यामुळेच आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यामध्ये भारतीय फलंदाजांची वर्चस्व असल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 3rd odi rohit sharmas century made history dominance of indian batsmen in odi cricket vbm