Rohit Sharma and Shubaman Gill Hundreds: आज २४ फेब्रुवारी मंगळवार रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना होळकर स्टेडियम इंदोर येथे खेळवला जात आहे. मालिकेतील पहिले २ सामने जिंकून यजमान भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. मात्र भारतीय संघासाठी आजचा सामना केवळ औपचारिकताच असला तरी आयसीसी रॅकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे. पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या जोडीने किवी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी उत्कृष्ट खेळ दाखवत आपआपली शतके साजरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय सलामीवीरांनी पहिल्या १० षटकांत ८२ धावा केल्या. रोहित शर्माने ८३ चेंडूत शतक साजरे केले. त्याच्या या शतकी खेळीला ९ चौकार आणि ६ षटकारांचा साज होता. हे त्याचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक ठरले असून १९ जानेवारी २०२० नंतर रोहितने शतक झळकावले आहे. हे ३०वे शतक ठरले ज्यापद्धतीने हे दोन्ही खेळतात आहे त्यानुसार कदाचित रोहित शर्मा आपले चौथे द्विशतक मारू शकत होता मात्र तो १०१ धावांवर तो बाद झाला. तर शुबमन गिलने ७२ चेंडूत शतक साजरे केले. गिलच्या या खेळीत १३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. त्याने द्विशतकपासून जी सुरुवात केली होती ती अशीच पुढे ठेवली आहे. सलग ४ डावातील शुबमनचे तिसरे शतक ठरले असून ११२ धावा करून तो बाद झाला. रोहित आणि शुबमन मध्ये २१२ धावांची सलामी भागीदारी झाली.

याआधी पिच रिपोर्ट दरम्यान अजित आगरकर म्हणाला होता की, “भारतीय वेगवान गोलंदाजांसाठी थोडा आनंद पाहायचा होता मात्र मला वाटत नाही की येथे तसे होईल. खेळपट्टीच्या मध्यभागी गवताचे आच्छादन आहे आणि ते एकत्र ठेवण्यासाठी जसजशी संध्याकाळ होत जाईल तसतसा चेंडू पुढे सरकत जाईल. बेअर पॅच फलंदाजांच्या अगदी जवळ जातात पण मला वाटत नाही की गोलंदाजासाठी खेळपट्टी चांगली आहे. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली दिसते.” आगरकरने सांगितलेले खेळपट्टीचे अनुमान अक्षरशः खरे ठरले. त्यामुळे असच भारतीय संघाची फलंदाजी अशीच सुरु राहिली तर ४०० पेक्षा जास्त धावा होऊ शकतात.  

हेही वाचा: ICC Men’s ODI Team: ना कोहली, ना रोहित… आयसीसी वन डे संघात फक्त हे दोन भारतीय, बाबर आझम असणार कर्णधार

तत्पूर्वी, टीम इंडिया २०१७ नंतर होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळणार असून या मैदानावर टीम इंडियाला एकदिवसीय अद्याप पराभव पत्करावा लागला नाही. अशा परिस्थितीत हाच क्रम कायम ठेवत न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष असेल. न्यूझीलंडने संघात एक बदल केला असून वेगवान गोलंदाज शिपलीला वगळले आहे. त्याच्या जागी जेकब डफीला संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, भारताने देखील दोन बदल केले असून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. दोघांच्या जागी उमरान मलिक आणि युजवेंद्र चहलला अंतिम अकरा मध्ये स्थान देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 3rd odi rohit shubman storms in indore scored centuries with fireworks of fours and sixes team indias progress towards a big score avw
Show comments