भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर किवी कर्णधार केन विल्यमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाचा डाव २१९ धावांवर गुंडाळला गेला. त्यामुळे न्यूझीलंड संघाला २२० धावांचे लक्ष्य मिळाले आहे. दरम्यान श्रेयस अय्यरने ४९ धावांचे योगदान अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे.

शुबमन गिलने २२ चेंडूचा सामना करताना १३ धावा केल्या. या खेळीत त्याने २ चौकार लगावले. पहिला सलामीवीर शुबमन गिल लवकर बाद झाल्याने श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने बाद होण्यापूर्वी त्याने ५९ चेंडूत ४९ धावांची खेळी खेळली. त्यात आठ चौकारांचा समावेश होता. यादरम्यान श्रेयसने एक नको असलेला आणि एक चांगला विक्रम विक्रम नोंदवला.

IND vs NZ New Zealand set India a target of 359 runs
IND vs NZ : भारताला १२ वर्षांचा विजयरथ कायम राखण्याचे आव्हान, विजयासाठी न्यूझीलंडने दिले ३५९ धावांचे लक्ष्य
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
IND vs NZ Sarfaraz Urges Rohit for DRS
IND vs NZ : सर्फराझच्या हट्टाने भारताला मिळवून दिली विकेट, रोहितकडे DRS घेण्यासाठी आग्रह करतानाचा VIDEO व्हायरल
SA vs NZ Women World Cup Final 2024 Highlights
SA vs NZ : क्रिकेट जगताला मिळाला नवा विश्वविजेता! न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर मात करत पटकावलं पहिलं जेतेपद
IND vs NZ 1st Test New Zealand beat India by 8 wickets
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताने नोंदवला लाजिरवाणा विक्रम, १९ वर्षांनंतर झाली मोठी उलथापालथ
IND vs NZ Tom Latham reaction to the win
IND vs NZ : ‘आम्हीही नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम…’, ऐतिहासिक विजयानंतर न्यूझीलंडच्या कर्णधाराचा मोठा खुलासा
IND vs NZ Rachin Ravindra reveals how CSK helped to him prepare to beat India
IND vs NZ : रचिन रवींद्रने भारताला हरवण्यासाठी केली होती जोरदार तयारी; धोनीच्या संघाने दिली साथ, सामन्यानंतर केला मोठा खुलासा
Sarfaraz Khan 3rd India batter to Duck and 150-plus score in the same Test for India
Sarfaraz Khan : सर्फराझने पहिल्याच शतकासह घडवला इतिहास, १९९६ नंतर ‘हा’ खास विक्रम नोंदवणारा ठरला पहिलाच भारतीय

श्रेयस अय्यर मधल्या फळीत सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज –

मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हा ३२ एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत १४२८ धावा केल्या आहेत. त्याच्या आधी शिखर धवनने ३२ वनडेत १२७५, केएल राहुलने १२५१, नवज्योतसिंग सिद्धूने १२४६, विराट कोहलीने १२४५ आणि एमएस धोनीने ११५३ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – इंग्रजीमुळे नसीम शाहची उडाली तारांबळ; भर पत्रकार परिषदेत म्हणाला असं काही की व्हिडीओ होतोय व्हायरल

तब्बल ३४ वर्षांनंतर श्रेयस नोंदवला नकोसा विक्रम –

या सामन्यात श्रेयस अय्यरने ४९ धावा केल्या आणि लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर कॉन्वेला झेल देत पॅव्हेलियनमध्ये परतला. तो त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १४ वे अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. यादरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेमध्ये ४९ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद होणारा तो पहिला भारतीय खेळाडूही ठरला आहे. याआधी माजी कर्णधार कपिल देव यांनी १९८८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये नाबाद ४९ धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून ४९ धावा करणारा अय्यर हा दुसरा खेळाडू आहे.