न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज खेळला जणार आहे. हा सामना इंदूर येथील होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीला मोठा विक्रम नोंदवण्याची संधी आहे. आज जर कोहलीने शतक झळकावले, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ हजार धावा पूर्ण करेल. त्याचबरोबर असा करणारा तो जगातील केवळ ६वा खेळाडू बनेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात १२ धावांनी विजय मिळवला होता. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात ८ विकेट्सने मोठा विजय नोंदवला. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंड क्लीन स्वीप देण्याचा भारताचा निर्धार असणार आहे.

कोहली २५ हजार धावांपासून एक शतक दूर –

विराट कोहलीने आतापर्यंत ४८९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ५३.७७च्या अप्रतिम सरासरीने २४९०० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १२९ अर्धशतके आणि ७४ शतके आहेत. जर कोहलीने आजच्या सामन्यात १०० धावा केल्या, तर तो आंतरराष्ट्रीय २५००० धावा पूर्ण करणारा जगातील ६वा आणि भारताचा दुसरा फलंदाज ठरेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

१.सचिन तेंडुलकर – ३४३५७
२.कुमार संगकारा – २८०१६
३.रिकी पाँटिंग – २७४८३
४.महेला जयवर्धने – २५९५७
५.जॅक कॅलिस – २५५३४
६.विराट कोहली – २४९००

हेही वाचा – भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका : मधल्या फळीच्या कामगिरीत सुधारणेची अपेक्षा!

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कोहलीने धुमाकूळ घातला होता –

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहलीच्या बॅटने धावांचा पाऊस पाडला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने दोन शतके झळकावली होती. त्याचबरोबर श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला होता. ज्यासाठी कोहलीला त्याच्या धडाकेबाज कामगिरीमुळे मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 3rd odi virat kohli needs just one century to complete 25000 international runs vbm