भारत आणि न्यूझीलंड संघात तिसरा आणि अंतिम टी-२० सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलनने भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याला सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहणे आवडते, असे त्याने म्हटले आहे. तो ज्या प्रकारचे फटके मारतो ते पाहून आश्चर्यचकित होतो. त्याचबरोबर तो विराट कोहलीचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याला खूप मानतो.
विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले, तर तो सध्या उत्तराखंडमध्ये आहे. विश्वचषकानंतर त्याला विश्रांती देण्यात आली असून तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळत नाही. तो टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याआधी त्याचा फॉर्म तितकासा चांगला नव्हता. पण त्याने टी-२० विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली आणि सर्वाधिक धावा केल्या.
फिन ऍलनने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना विराट कोहलीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”विराट कोहली काही काळासाठी आउट ऑफ फॉर्म होता. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत तो ज्या प्रकारे बाहेर आला आहे. ते कौतुकास्पद आहे. त्याने विश्वचषकात आपल्या देशासाठी सर्वाधिक धावा केल्या आणि ते खुपच शानदार होते.”
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात जबरदस्त शतक झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादवचेही फिन अॅलनने कौतुक केले. त्या सामन्यात सूर्यकुमार यादवने असे काही शॉट्स केले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणाला,”मला सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहणे खूप आवडते. तो जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज असून खूप मेहनतीने फलंदाजी करतो. काही शॉट्स तो अशा प्रकारे खेळतो की, या जगात कोणीही करू शकत नाही. मला त्याच्यासारखे फटके मारायला नक्कीच आवडेल.”