भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या निर्णायक सामन्यात यजमान भारताने न्यूझीलंडला डोकेही वर न काढू देता १६८ धावांनी एकतर्फी विजय मिळवला. भारतीय संघाचा हा मायदेशातील सलग २४वा मालिका विजय ठरला. या विजयाचे साक्षीदार होण्याची संधी अनेक मान्यवरांना काल लाभली त्यात bcciचे सचिव जय शाह, bcciचे खजिनदार आणि भाजपाचे आमदार आशिष शेलार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार हे त्यात सहभागी होते.
भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिलने कालच्या या नाबाद १२६ धावांच्या खेळी करत अनेक दिग्गजांचे मोठमोठे विक्रम मोडले. त्याच्या फटकेबाजीनंतर भारतीय जलदगती गोलंदाजांनी कमाल केली. त्यात सूर्यकुमार यादवने टिपलेले तीन अफलातून झेल, सामन्याला कलाटणी देणारे ठरले. षटकारांची आतषबाजी करणारा हा सामना चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना पाहण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार हेही उपस्थित होते.
नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इशान किशन लवकर बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी याने मोर्चा सांभाळत वेगवान ४४ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने गिलने ३५ चेंडूंवर सात चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर त्याने आपल्या खेळाची गती वाढवली. त्याने अर्धशतक ते शतक हा टप्पा केवळ १९ चेंडूंमध्ये पूर्ण केला. त्याचवेळी गिल व कर्णधार हार्दिक पंड्या यांच्या दरम्यान १०३ धावांची भागीदारी झाली. गिलने अखेरपर्यंत नाबाद राहत १२६ धावांची खेळी केली. यासह भारताने निर्धारित २० षटकात २३४ धावा काढल्या.
भारतीय संघाचं सर्वत्र कौतुक होत आहे. हा सामना कोट्यवधी भारतीय चाहते घरी बसून पाहत होते, तसेच अहमदाबादच्या स्टेडियमवरही मोठी गर्दी होती. या गर्दीत राजकीय नेत्यांचाही समावेश होते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेही या सामन्याला उपस्थित होते. “गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, #BCCI चे सचिव जय शाह आणि आशिष शेलार यांच्यासमवेत अहमदाबादमध्ये भारत-न्यूझीलंड मॅच बघण्याचा आज योग आला. यावेळी भारताच्या विजयाने आणि स्टार फलंदाज शुबमन गिलच्या शानदार सेंच्युरीने मॅचची रंगत अधिकच वाढली.” असे त्यांनी ट्वीट केले.