भारत आणि न्यूझीलंड संघात आज तिसरा आणि अंतिम टी-२० सामना नेपियर येथे खेळला जात आहे. संजू सॅमसनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० मध्येही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. यामुळे चाहते प्रचंड संतापले असून सोशल मीडियावर संघ व्यवस्थापनावर टीका करत आहेत. अशात सॅमसनचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सॅमसनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कमेंटमध्ये चाहते सॅमसनला संघात स्थान न दिल्याने टीका करत आहेत.
फोटोत, सॅमसन समुद्रकिनारी एका बाकावर बसून दृश्याचा आनंद घेत आहे. तसेच न्यूझीलंड असे लिहिले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सॅमसनला स्थान मिळाले नाही. यानंतर नेपियरमध्ये होत असलेल्या तिसऱ्या टी-२० मध्ये सॅमसनला संधी दिली गेली नाही.
आता चाहते संघ व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत आहेत. एका यूजरने लिहिले – इथेही बेंचवर. दुसऱ्या युजरने लिहिले, भारताचा नंबर वन खेळाडू. तिसऱ्या युजरने लिहिले, सर, मला दुसरा टी20 बघायचा होता, पण जेव्हा मला कळले की तुम्ही संघात नाही, तेव्हा मी सामनाही पाहिला नाही.
एका यूजरने लिहिले, भारतीय संघ व्यवस्थापन श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि इशान किशन सारख्या खेळाडूंना खेळायला शिकत नाही तोपर्यंत लहान फॉरमॅटमध्ये संधी देत राहील. टीम इंडियाला तुमच्यासारख्या (संजू सॅमसन) फलंदाजाची उणीव भासत आहे. तुमच्याकडे टी-२० खेळण्यासाठी आवश्यक असलेली वृत्ती आणि स्वभाव आहे. आशा आहे की, तुम्हाला संधी मिळेल आणि आम्ही तुम्हाला पुढील टी-२० विश्वचषकात खेळताना पाहू इच्छितो.
वनडे मालिकेत संजू सॅमसनही टीम इंडियाचा एक भाग आहे. भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर २५ नोव्हेंबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. शिखर धवन वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असेल. पहिला वनडे २५ नोव्हेंबरला ऑकलंडमध्ये, दुसरा एकदिवसीय सामना २७ नोव्हेंबरला हॅमिल्टनमध्ये आणि तिसरा एकदिवसीय सामना ३० नोव्हेंबरला क्राइस्टचर्चमध्ये खेळवला जाणार आहे.