टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ३ सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज म्हणजे मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी मॅक्लीन पार्क नेपियर येथे होणार आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यात देखील प्रथम फलंदाजी करताना पावसाने अडथळा आणला होता. मात्र तेव्हा मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यामुळे षटके कमी न करता सामना पार पडला. भारताने दुसरा सामना ६५ धावांनी जिंकला.
टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ हरले होते. अशा परिस्थितीत त्या स्पर्धेच्या आठवणी विसरून संघांना नव्याने सुरुवात करायची आहे. भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्यावर आहे. मिशन २०२४ टी२० विश्वचषकासाठी तो महत्त्वाचा मानला जात आहे. भारतीय संघ सध्या संक्रमणाच्या टप्प्यात आहे. अशा स्थितीत तो टी२० मध्ये कर्णधारपदाचा दावा करू इच्छितो. याशिवाय युवा खेळाडूही संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी टीम साऊथी न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तसेच, मार्क चॅपमनचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाची संपूर्ण जबाबदारी पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव याच्यावर असेल. या सामन्यात भारतीय संघ काही बदल करू शकते. वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर कुलदीप यादवही खेळू शकतो.
सामना कुठे आणि कधी पाहू शकणार
क्रिकेट चाहते दुसऱ्या टी२० सामन्यात या गोष्टीने चिंतेत होते की, सामना टीव्हीवर कसा पाहिला पाहिजे. अशात मालिकेतील तिसऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याबद्दल सर्वकाही जाणून घेऊया. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.०० वाजता सुरु होणार आहे. हा सामना तुम्हाला अमेझॉन प्राइमवर लाइव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ अॅपवर पाहू शकता. तसेच दूरदर्शनच्या डी डी स्पोर्ट्सवर देखील तुम्ही थेट प्रक्षेपण पाहू शकतात.
भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ॠषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप यादव सिंग, हर्षल पटेल, मो. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंड संघ
केन विलियम्सन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), लॉकी फर्ग्युसन, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर