IND vs NZ 3rd Test Match New Zealand set India a target of 174 runs : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडेवर सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात २३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २६३ धावांवर गारद झाला. यासह पहिल्या डावाच्या जोरावर भारताने २८ धावांची आघाडी घेतली. तसेच भारताच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडचा दुसरा डाव १७४ धावांत गुंडाळला. ज्यामुळे भारताला विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
किवींनी रविवारी नऊ बाद १७१ धावांवरून सुरुवात केली आणि तीन धावा करत शेवटची विकेट गमावली. रवींद्र जडेजाने शेवटच्या विकेटच्या रुपाने एजाज पटेलला आकाश दीपकडे झेलबाद केले. त्याला आठ धावा करता आल्या. विल्यम ओ रूक दोन धावा करून नाबाद राहिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २६३ धावांवर संपला. भारताकडे २८ धावांची आघाडी होती. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचा दुसरा डाव १७४ धावांवरच आटोपला आणि त्यांची एकूण आघाडी १४६ धावांची झाली आहे.
विल यंगने किवीजकडून केल्या सर्वाधिक धावा –
आता हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिकेचा शेवट गोड करण्याची संधी आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा हा आत्मविश्वास वाढवणारा विजय असेल. याआधी शनिवारी विल यंगने किवीजकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५१ धावांची शानदार खेळी केली. त्याच्याशिवाय कॉनवेने २२, मिशेलने २१ आणि फिलिप्सने २६ धावा केल्या. उर्वरित चार फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
हेही वाचा – Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विनची वानखेडेवर कमाल! अनिल कुंबळेला मागे टाकत केला खास पराक्रम
भारताच्या फिरकीपटूंसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टेकले गुडघे –
रचिन रवींद्र चार धावा करून बाद झाला, टॉम ब्लंडेल चार धावा करून, ईश सोधी आठ धावा करून आणि कर्णधार टॉम लॅथम एक धावा करून बाद झाला. भारताकडून जडेजाने पाच, तर अश्विनने तीन विकेट घेतल्या. तसेच आकाश दीप आणि सुंदर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. जडेजानेही पहिल्या डावातही पाच विकेट्स घेतल्या होत्या. अशा प्रकारे जडेजाने या कसोटीत एकूण १० विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.