IND vs NZ Washington Sundar to Rachin Ravindra bowled third time : न्यूझीलंडचा युवा स्टार रचिन रवींद्रने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेची सुरुवात बेंगळुरूमध्ये १३४ धावांची खेळी करून केली होती. पुढच्या डावात त्याने नाबाद ३९ धावा केल्या. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ६५ आणि दुसऱ्या डावात ९ धावा केल्यानंतर तो बाद झाला. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ५ धावा करून बाद झाला. या कसोटी मालिकेत तो आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे, पण तो वॉशिंग्टन सुंदरसमोर हतबल दिसला आहे. कारण वॉशिंग्टनने सलग तिसऱ्या डावात रचिन रवींद्रला त्रिफळाचीत केले, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

वॉशिंग्टन सुंदरने सलग तिसऱ्यांदा रचिन रवींद्रला त्रिफळाचीत केले –

वॉशिंग्टन सुंदरने सलग तिसऱ्या डावात रचिन रवींद्रला त्रिफळाचीत केले आणि जवळपास तिन्ही वेळा सुंदरने एकाच पद्धतीने किवी फलंदाजाला बाद केले आहे. पुणे कसोटीच्या दोन्ही डावात सुंदरने रचिनला त्रिफळाचीत केले होती आणि आता मुंबई कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने जादुई चेंडूने रचिनला त्रिफळाचीत केले. सुंदरचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या रेषेत होता आणि सुंदरने चेंडू राउंड द विकेटवर टाकला. रचिन चेंडूच्या रेषेत आला आणि त्यावर बचावात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूने टर्न घेत रचिनचा बचाव भेदला आणि ऑफ स्टंपवर जाऊन आदळला.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
IND vs NZ Sunil Gavaskar Smashes Plate While Lunch After Seeing Washington Sundar New Ball Against New Zealand Ravi Shastri
IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरमुळे सुनील गावसकरांनी जेवताना फोडली प्लेट, रवी शास्त्रींनी कॉमेंट्री करताना सांगितलं नेमकं काय घडलं?
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?
Virat Kohli run out after Matt Henry direct hit video viral IND vs NZ 3rd Test
Virat Kohli : विराट कोहलीचा आत्मघातकी रनआऊट, रनमशीनचा वेग कमी पडला अन्… पाहा VIDEO
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

वॉशिंग्टन सुंदरने टॉम लॅथमचा उडवला त्रिफळा –

यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमचीही अशाच पद्धतीने शिकार केली होती. लॅथम क्रीजवर स्थिरावला होता. त्याचा बचाव भेदणे कठीण वाटत होते. पण, यानंतर १६व्या षटकात विराट कोहलीने सुंदरला सल्ला दिला. त्याने वॉशिंग्टनला लाइन आणि लेन्थ बदलण्याचा सल्ला दिला. सुंदरने त्याचे म्हणणे ऐकले आणि राउंड द विकेट बॉलिंग करायला आला आणि क्रिझच्या जरा वाइड अँगलमधून चेंडू टाकला. लॅथमने या चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू थोडासा वळला आणि त्याच्या बॅटची कड घेऊन तो स्टंपला लागला. अशा प्रकारे लॅथमचा डाव संपला.

हेही वाचा – Virat Kohli : ‘RCB ने विराट कोहलीला कर्णधार करु नये, कारण…’, IPL 2025 पूर्वी माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने पहिल्या डावात तीन गडी गमावून ९२ धावा केल्या होत्या. सध्या विल यंग ३८ धावांवर नाबाद असून डॅरिल मिशेल ११ धावांवर नाबाद आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. संघाला १५ धावांवर पहिला धक्का बसला. आकाश दीपने डेव्हॉन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला चार धावा करता आल्या. यानंतर कर्णधार टॉम लॅथमने विल यंगसोबत ४४ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी वॉशिंग्टन सुंदरने मोडली. त्याने लॅथमला त्रिफळाचित केले. लॅथम २८ धावा करून बाद झाला. यानंतर सुंदरने रचिन रवींद्रलाही त्रिफळाचीत केले. त्याला पाच धावा करता आल्या. सुंदरने सलग तीन डावांत रचिनला तिसऱ्यांदा बाद केले.

Story img Loader