भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. सतत क्रिकेट खेळल्यामुळे दोन्ही संघातील अनेक खेळाडूंनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला असून केन विल्यमसननंतर आता न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनच्या नावाचा या यादीत समावेश झाला आहे. कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जेमीसनने भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे.

रविवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर किवी संघ भारतात आला आहे. या कारणास्तव त्यांनी खेळाडूंवरील वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन टी-२० मालिकेतील काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत आधीच बोलले आहे. आयपीएल आणि टी-२० वर्ल्डकपच्या टप्प्यातही जेमीसनचा सहभाग होता.

हेही वाचा – जोडी नंबर १..! रोहित-राहुलबाबत सुनील गावसकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “जर तुम्ही दोघांच्या..”

न्यूझीलंड क्रिकेटने आयोजित पत्रकारांशी बोलताना प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले, ”केन आणि काइल यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की ते या टी-२० मालिकेत खेळणार नाहीत. ते दोन्ही कसोटी सामन्यांसाठी तयारी करत आहेत आणि मला वाटते की आणखी बरेच कसोटी खेळाडू आहेत जे कदाचित संपूर्ण टी-२० मालिका खेळणार नाहीत. सध्या ही थोडीशी संतुलित कृती आहे आणि पाच दिवसांत तीन सामने आहेत. तीन वेगवेगळ्या शहरांचा प्रवास, त्यामुळे खूप व्यस्त असणार आहे.”

गॅरी स्टेड म्हणाले, ”कामाचा ताण पाहता संघातील सर्व खेळाडूंना संधी मिळेल. तुम्हाला नक्कीच दिसेल की संपूर्ण संघातील खेळाडूंना सामन्याचा वेळ मिळतो आणि खेळाडूंवर कामाचा भार व्यवस्थापित करणे आमच्यावर अवलंबून आहे. विशेषत: पुढील आठवड्यात होणार्‍या कसोटी मालिकेकडे पाहणे, जे स्पष्टपणे आमचे प्राधान्य आहे.”

Story img Loader