ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषक २०२२ मध्ये खराब कामगिरीनंतर टीम इंडिया तीन एकदिवसीय आणि टी२० सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेली. या दौऱ्यात विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल आणि इतर अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. वरिष्ठ खेळाडूंव्यतिरिक्त प्रथमच प्रशिक्षक राहुल द्रविडलाही विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मणला संधी देण्यात आली आहे.
माजी यष्टीरक्षक क्रिकेटपटू अजय जडेजानेही भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना विश्रांती देण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. प्रशिक्षकाला विश्रांतीची गरज नाही, असे त्याने म्हटले आहे. अजय जडेजाआधी माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही राहुल द्रविडबाबत असे म्हटले आहे. न्यूझीलंड मालिका आणि बांगलादेश दौऱ्यात थोडाच कालावधी असल्याने द्रविडला कसोटी संघासोबत राहायचे होते, असे असेल कदाचित म्हणून त्याने या दौऱ्यावर विश्रांती घेतली असावी,” असे जडेजा म्हणाला, ” हा दौरा संपवून यासंघातील काही खेळाडू हे इथूनचं बांगलादेशला जाणारे असतील तर त्यात फक्त चार दिवसांचा फरक आहे,” असेही तो पुढे म्हणाला.
खरं तर, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, रविवारी प्राइम व्हिडिओवर बोलताना अजय जडेजाने ब्रेक घेतल्याबद्दल राहुल द्रविडवर टीका केली आणि प्रशिक्षकासाठी संघासोबत राहणे किती महत्त्वाचे आहे हे देखील सांगितले. त्यांच्या मते, भारतीय संघाच्या प्रशिक्षकाला आयपीएलदरम्यान दोन महिन्यांची विश्रांती मिळते, ते पुरेसे आहे आणि अशा परिस्थितीत संघाला मध्येच सोडले जाऊ नये.
प्रशिक्षकांना विश्रांतीची गरज नाही- जडेजा
जडेजा पुढे म्हणाला, “आयपीएलमध्ये तुम्हाला अडीच महिन्यांचा ब्रेक मिळतो. म्हणजे ते माझे मित्र आहेत. विक्रम राठोड यांच्यासोबत खेळला आहे. द्रविड भारतासाठी महान क्रिकेटपटू आहे. म्हणजे, त्यांचा अनादर नाही, पण हे एक काम आहे जे तुम्ही काही वर्षे करता आणि तुम्ही खेळाडू म्हणून तुमचे सर्व काही देता. त्यामुळे काहीतरी मोठे असल्याशिवाय ब्रेक घेऊ नका.” तो इथेच थांबला नाही तो असेही म्हणाला की, “अनेक भारतीय खेळाडू आहेत जे न्यूझीलंड दौऱ्यानंतर थेट श्रीलंकेला जाणार आहेत मग प्रशिक्षक असे का करू शकत नाहीत.”