टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेला भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. जिथे टीम इंडियाला केन विल्यमसनच्या संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. तसेच, या मालिकेतील पहिला टी-२० सामना वेलिंग्टनमध्ये १८ नोव्हेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून खेळवला जाईल. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघातील काही खेळाडू वेलिंग्टनच्या बीचवर मस्ती करताना दिसले आहेत.

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे काही खेळाडू वेलिंग्टनच्या बीचवर मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये टीमचा कर्णधार हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंगसह मोहम्मद सिराज दिसत आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे वेळापत्रक –

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिला टी-२० सामना शुक्रवारी वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुसरा टी-२० सामना २० नोव्हेंबर रोजी माउंटमनुगेई येथे खेळवला जाईल. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना २२ नोव्हेंबर रोजी नेपियर येथे खेळवला जाणार आहे. तसेच २५ नोव्हेंबरपासून ईडन पार्कवर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे, तर दुसरा एकदिवसीय सामना २७ नोव्हेंबरला सिडॉन पार्कवर, तर तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना ३० नोव्हेंबरला हॅगले ओव्हलवर होणार आहे.

हेही वाचा – IND vs NZ T20 Series: हार्दिक पांड्याने विल्यमसनसोबत घेतला ‘क्रोकोडाइल बाईक’चा आनंद, पाहा व्हिडिओ

भारत आणि न्यूझीलंड संघ –

भारतीय संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.

न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी आणि ब्लेअर टिकनर.

Story img Loader