India vs New Zealand, ICC World Cup 2023: जेव्हा आपण क्रिकेट विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला २०१९चा पराभव, धोनीचे अश्रू, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे निराश चेहरे आठवतात. आज बदला घेण्याची ही योग्य संधी आहे. आज क्रिकेट विश्वचषक २०२३चा उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. आजच्या सामन्यासाठी डेव्हिड बेकहॅम पासून ते मनोरंजन क्षेत्रातील स्टार्सपर्यंत सर्वांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे.

याच मैदानावर भारताने दुसरा विश्वचषक (२०११) जिंकला होता. लाखो क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममधून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे, परंतु ही संधी फक्त काही हजार लोकांनाच मिळेल, ज्यांनी योग्य वेळी तिकीट काढले. आजच्या सामना पाहण्यसाठी बॉलीवूड स्टार्सही स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. त्यात सलमान खान, आमिर खान, रणबीर कपूर यांच्या नावांचा समावेश आहे. दुसरीकडे, माजी दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम देखील या सामन्याचे साक्षीदार असणार आहे. सचिन तेंडुलकर समवेत तो स्टेडियममध्ये बसला आहे.

IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
Mohammed Rizwan Takes DRS After Consulting With Adam Zampa and Loses Review Watch Video AUS vs PAK 2nd ODI
PAK vs AUS: हा काय प्रकार? मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या सांगण्यावरून घेतला रिव्ह्यू अन् सापडला अडचणीत; पाहा VIDEO
KL Rahul Odd Dismissal Video Goes Viral He Gets Bowled Out Between his Legs in India vs Australia A
KL Rahul Wicket Video: असं कोण आऊट होतं??? राहुलची विकेट पाहून चक्रावून जाल, नेमका कसा झाला क्लिन बोल्ड, पाहा व्हीडिओ
Alzarri Joseph Got Angry on West Indies Captain Shai Hope on Field Setting and Leaves the Ground in Live Match of WI vs ENG Watch Video
Video: अल्झारी जोसेफ कर्णधारावरच भडकला, रागाच्या भरात थेट गेला मैदानाबाहेर, १० खेळाडूंसह खेळण्याची वेस्ट इंडिजवर ओढवली वेळ
Afro Asia Cup Set to Return After Almost Two Decades India and Pakistan Players Could Play in Same Team
Afro Asia Cup: भारत पाकिस्तानचे खेळाडू दोन दशकांनंतर एकाच संघातून खेळणार? लोकप्रिय क्रिकेट मालिकेबाबत मोठी अपडेट

भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्या प्रवासाविषयी बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाला हरवून त्यांनी आपल्या मोहिमेची सुरुवात केली, त्या सामन्यात भारताची टॉप ऑर्डर डळमळीत झालेली दिसली पण त्यानंतर खेळलेले सर्व ८ सामने जिंकण्यात रोहित शर्मा आणि संघाला कोणतीही अडचण आली नाही. मात्र, तुम्ही शेवटचा सामना कसा जिंकलात, याचा आजच्या सेमीफायनलवर काहीही परिणाम होणार नाही आणि हे रोहित शर्मालाही माहीत आहे. न्यूझीलंडने सलग ४ विजयांनी सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर सलग ४ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अंतिम सामना जिंकून न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल सामना पाहण्यासाठी आलेले विविध क्षेत्रातील सन्मानीय अतिथी

भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीचा सामना पाहणाऱ्यांमध्ये सर्वात मोठे नाव म्हणजे इंग्लंडचा महान फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम, तो सध्या भारतात आहे. नुकताच तो गुजरातमध्ये गेला होता, तो आजचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आला आहे. तसेच, अनेक बॉलिवूड स्टार्सही स्टेडियममध्ये दिसणार आहेत. रजनीकांत, सलमान खान, आमिर खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग स्टेडियममध्ये दिसत आहेत. मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानीही सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचणार आहेत.

टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी सारा तेंडुलकर, शाहरुख खानची मुले आणि अनेक बॉलिवूड स्टार्स यांच्या घरातील लोकही सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. जर वानखेडे स्टेडियमबद्दल बोलायचे झाले तर, ३२ हजार लोकांची सोय आहे, जर आपण १ हजार अतिरिक्त लोकांचा अंदाज लावला तर आज स्टेडियममध्ये सुमारे ३३ हजार लोक उपस्थित असतील.

हेही वाचा: IND vs NZ सामन्याआधी शेवटच्या क्षणी वानखेडेमधील खेळपट्टी बदलल्याचा BCCI वर आरोप, नेमका वाद काय?

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि प्रवाह

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. थेट प्रवाह डिस्ने प्लस हॉटस्टारवर असेल. डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर मोबाईलवर थेट क्रिकेट सामने पूर्णपणे मोफत दाखवले जातील. याशिवाय तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर थेट सामन्यांचा आनंद घेऊ शकता.