Gautam Gambhir on Ishan Kishan:रांचीतील पहिल्या टी२० सामन्यात ५ चेंडूत ४ धावा करून इशान किशनला मायकल ब्रेसवेलने त्रिफळाचीत केले. यजमान संघाला पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर हा ताफा लखनऊला पोहोचला जिथे पुन्हा एकदा भारतीय सलामीवीर इशान किशन संघर्ष करताना दिसला. इशान किशनने ३२ चेंडूत १९ धावा करून धावबाद होण्यापूर्वी खेळपट्टीवर खूप संघर्ष केला. भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने इशान किशनच्या फॉर्मवर प्रतिक्रिया दिली आहे.

भारताचा सलामीवीर गौतम गंभीर त्याचे कौतुक करताना थकत नव्हता. या एकदिवसीय सामन्यानंतर जेव्हा किशनला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत स्थान मिळाले नाही तेव्हा त्याने आश्चर्य व्यक्त केले. पण आता इशान किशनच्या सततच्या फ्लॉपमुळे तोही चिंतेत आहे आणि या फलंदाजासोबत तो जास्त खूश दिसत नाहीये. इशान किशन आता लवकरच दडपणाखाली असून तो आपली विकेट गमावत आहे.

Gaurav Gogoi on Ranveer Allahbadia
Ranveer Allahbadia: “अशा लोकांना तुम्ही…”, रणवीर अलाहाबादियाचे एकेकाळी कौतुक करणाऱ्या पंतप्रधान मोदींना काँग्रेस खासदाराचा सवाल
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
AnJali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania : “दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “खरंतर मला…”
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
vishal gawli
कल्याण पूर्वेत बालिका अत्याचार हत्येमधील कुटुंबीयांच्या घरासमोर तरुणांची दहशत; “जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो…”
Shivraj Rakshe
Shivraj Rakshe : “…म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला”, शिवराज राक्षेने सांगितलं मॅटवर नेमकं काय घडलं?
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Interstate gang of asphalt thieves arrested with valuables
डांबर चोरणारी आंतरराज्य टोळी मुद्देमालासह पकडली

हेही वाचा: IND vs NZ: सामन्यापेक्षा गाजली लखनऊची खेळपट्टी! हार्दिकनंतर टीम इंडियाच्या बॉलिंग प्रशिक्षकाची आगपाखड, क्युरेटर वादाच्या भोवऱ्यात

गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितले की, “बॅटिंग युनिट म्हणून टीम इंडिया फिरकी गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसली आहे. हे मोठे षटकार मारणे सोपे आहे पण, स्ट्राईक सातत्याने रोटेट करण्याची क्षमता अवघड आहे. जेव्हा तुम्ही मायकेल ब्रेसवेलला इशान किशनविरुद्ध बाद केले तेव्हा ते अगदी स्पष्ट झाले.

१०० धावांचे लक्ष्य गाठताना टीम इंडियाचा बँड वाजला. शुबमन गिल आणि इशान किशन यांनी डावाची सलामी दिली, पण दोन्ही फलंदाजांनी किवींच्या गोलंदाजीसमोर खूप संघर्ष केला. स्टार स्पोर्ट्सवर गंभीर म्हणाला, “हे फक्त एका खेळाडूबद्दल नाही, मला वाटते की या युवा फलंदाजांनी स्ट्राईक कसे रोटेट करायचे ते लवकर शिकले पाहिजे.”

हेही वाचा: Neeraj Chopra: ‘जेव्हा गोल्डन बॉय नतमस्तक होतो…’  पहिल्यावहिल्या विश्वचषकातील ऐतिहासिक विजयानंतर मैदानात उतरून केला कौतुकाचा वर्षाव पाहा video

वेळीच सुधारा नाहीतर पर्याय उपलब्ध आहेत

गौतम गंभीर पुढे म्हणाला, “मला वाटते की या युवा खेळाडूंना लवकरात लवकर स्ट्राईक कसे रोटेट करायचा हे शिकायला हवे कारण मैदानात उतरून अशा खेळपट्टीवर मोठे षटकार मारणे सोपे नसते. बांगलादेशात द्विशतक झळकावल्यानंतर त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते आश्चर्यकारक आहे. त्यानंतर त्याने संघर्ष केला आहे, ज्या प्रकारची खेळी खेळली त्यामुळे त्याचा आलेख वाढेल असे सर्वांना वाटत होते पण तसे झाले नाही. वेळीच फलंदाजीतील तंत्रात बदल केला नाही तर मात्र त्याच्या जागेवर खूप पर्याय उपलब्ध असून संघातील जागा गमवावी लागू शकते.”

Story img Loader