भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वन-डे सामन्यात महेंद्रसिंह धोनीला मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी दिनेश कार्तिकने तिसऱ्या सामन्यात यष्टीरक्षक केलं. मे 2019 साली होणारा विश्वचषक लक्षात घेता, संघातील महत्वाच्या खेळाडूंची शारिरिक तंदुरुस्तीही महत्वाची आहे. याच कारणासाठी बीसीसीआय महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देत आहे. त्यामुळे धोनीला झालेल्या दुखापतीमुळे त्याचे चाहते हे आज चिंतेत दिसले. मात्र वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतरही धोनी मैदानात अजुनही फिट अँड फाईन आहे.

गेल्या 12 वर्षांच्या कालावधीत धोनी केवळ 3 वेळा दुखापतीमुळे संघाबाहेर बसला आहे. मधल्या काळात धोनीच्या संथ खेळीवर अनेकांनी टीका केली होती. मात्र धावा काढताना त्याचा वेग, यष्टींमागे त्याची चपळाई पाहता तो अजुनही तंदुरुस्त असल्याचं दिसतं होतं. सध्यातरी धोनीची दुखापत गंभीर नसल्याचं बोललं जातंय, त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोनीची ही शारिरिक तंदुरुस्ती विश्वचषकापर्यंत अशीच कायम राहो अशी प्रार्थना त्याचे चाहते करताना दिसत आहेत.

Story img Loader