India vs New Zealand Match Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. १८ जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने १२ धावांनी विजय मिळवला. शुबमन गिलने भारतीय संघासाठी द्विशतक केले. न्यूझीलंडसाठी मायकेल ब्रेसवेलने प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत १-० असा आघाडीवर आला आहे. मात्र नेहमीप्रमाणे विरोधी संघातील तळाचे फलंदाज बाद करण्यात भारतीय संघाला अडचण येत असून यावर रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली आहे.

शुबमनने आपल्या खेळीने इतिहास रचत द्विशतक साजरे केले. त्याने १४९ चेंडूवर २०८ धावांची खेळी केली. त्याच्याच योगदानाने भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर ३५० धावांचे आव्हान ठेवले. भारतीय संघाने ठेवलेल्या या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची फलंदाजी कोसळली. सिराज, शमी व कुलदीप यांच्या गोलंदाजीमुळे न्यूझीलंडने आपले पहिले सहा फलंदाज १३१ धावांवर गमावले. मात्र, त्यानंतर मायकेल ब्रेसवेल व मिचेल सॅंटनरने भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. दोघांनी १६३ धावांची मोठी भागीदारी रचली. ब्रेसवेलने केवळ ५७ चेंडूंमध्ये आपले दुसरे शतक पूर्ण केले. ४६व्या षटकात सिराजने अर्धशतक केलेल्या सॅंटनर आणि शिप्ली यांना बाद करत सामन्यात रंगत निर्माण केली. अखेरच्या षटकात विजयासाठी २० धावांची गरज असताना ब्रेसवेल दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे भारतीय संघाने १२ धावांनी सामना आपल्या खिशात घातला. ब्रेसवेलने ७८ चेंडूवर १२ चौकार व १० षटकारांचा पाऊस पाडत १४० धावांची खेळी केली. द्विशतकी खेळी करणारा गिल सामनावीर ठरला.

yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
maharashtra vidhan sabha election 2024 chief ministers decision after the election to avoid displeasure in mahayuti
महायुतीत नाराजी टाळण्यासाठीच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर?
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की

हेही वाचा: IND vs NZ 1st ODI: विराट कोहलीचा ‘हा’ सल्ला कामी आला अन् शार्दुल ठाकूरने लिहिली विजयाची कहाणी, मात्र रोहित नाराज…

तळाचे फलंदाज बाद करण्यात टीम इंडियाला अपयश

मागील काही १२ ते १३ एकदिवसीय सामन्यातील आकडेवारी पाहता भारतीय संघाला तळाचे फलंदाज बाद करण्यात अपयश आलेले स्पष्टपणे दिसत आहे. यावर आगामी विश्वचषक २०२३च्या दृष्टीने गोलंदाजी क्रमात बदल करणे अपेक्षित आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात देखील दोन्ही वेळेस मेहदी हसन मिराजने भारताच्या तोंडचा घास पळवला. आशिया चषकात देखील पाकिस्तानचा असिफ अलीने ४७ धावांची खेळी करून सामना काढून नेला. तसेच नुकत्याच झालेल्या श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी२० मालिकेत देखील असेच पाहायला मिळाले. कर्णधार दासुन शनाकाने शेवटी येऊन अक्षरशः झोडपले होते. न्यूझीलंडविरुद्ध काल झालेल्या सामन्यातही तेच पाहावयास मिळाले.

हेही वाचा: IND vs NZ 1st ODI: “हे क्रिकेट नाही…!” इशान किशनच्या वागण्यावर सुनील गावसकर भडकले, थेट कॉमेन्ट्री बॉक्समधून टोचले कान

सामन्यानंतर ब्रेसवेलने व्यक्त केल्या भावना

मायकेल ब्रेसवेल सामन्यानंतर म्हणाला, “आम्ही फक्त स्वतःला संधी देण्याचा प्रयत्न करत होतो. दुर्दैवाने आम्ही शेवटी चुकलो. सँटनर आणि मी चांगली भागीदारी केली आणि खेळ शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस भरपूर धावा शिल्लक होत्या. शेवटच्या टप्प्यात त्याने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात २० धावा हव्या होत्या आणि आजचा दिवस माझा नव्हता. हे माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचे सुरुवातीचे दिवस आहेत आणि माझ्याकडे या गोलंदाजांचे फारसे फुटेजही नाही.”