भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना ग्रीन पार्क, कानपूर येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या असून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता १२९ धावा केल्या आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रेयस अय्यर चर्चेत राहिला, त्याचप्रमाणे स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. एवढेच नाही, तर त्याला ‘गुटखा मॅन’ असे नावही देण्यात आले. जाणून घ्या, कोण आहे ती व्यक्ती आणि काय आहे संपूर्ण प्रकरण.
कानपूरमध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या या चाहत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. लाइव्ह मॅच सुरू असताना त्याचा फोटो टीव्हीवर दाखवण्यात आला. काही मिनिटांतच या व्यक्तीचा गुटखा खात असल्याचा व्हिडीओ वेगवेगळ्या हँडलवरून सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर ट्विटरवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या व्यक्तीचा गुटखा खातानाचा फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा – “टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तानला घाबरला”, इंझमामचं बेधडक वक्तव्य; ‘या’ शब्दाचा केला वापर!
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती फोनवर बोलताना दिसत आहे. त्याच्यासोबत एक महिलाही बसलेली आहे. कॅमेरा त्यांच्यापर्यंत पोहोचताच त्यावेळी त्या व्यक्तीचे तोंडही पूर्ण उघडता येत नव्हते आणि काही लोकांनी त्याने गुटखा खाल्ल्याचे सांगितले. आता या व्यक्तीची ओळख पटली आहे.
स्टेडियममध्ये गुटखा, पान, सुपारी यांसारख्या वस्तूंवर बंदी आहे. अशा परिस्थितीत कानपूर पोलिसांनीही या व्यक्तीचा शोध सुरू केला होता. शोभित पांडे असे या व्यक्तीचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये शोभितने त्याच्यासोबत बसलेल्या महिलेला बहीण म्हटले आहे. ती म्हणाली, “माझा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी माझ्यासोबत माझी बहीण बसली होती. मी गुटखा किंवा पान मसाला खाल्ला नव्हता, ती गोड सुपारी तोंडात होती.”