हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड येथे पोहोचला आहे. टीम इंडियाला यजमान संघाविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला टी-२० सामना वेलिंग्टनमध्ये १८ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन वेलिंग्टनच्या रस्त्यावर ‘क्रोकोडाइल बाइक’चा आनंद लुटताना दिसले आहेत. त्यांचा क्रोकोडाइल बाइक’चा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंड क्रिकेटने त्यांच्या सोशल मीडियाच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हार्दिक पांड्या आणि केन विल्यमसनचा हा व्हिडिओ अपलोड केला आहे. व्हिडिओमध्ये दोघांनीही डोळ्यावर काळा चष्मा लावला आहे. हार्दिक पांड्या आणि केन विल्यमसन त्यांच्या टीमची जर्सी घालून ‘क्रोकोडाइल बाइक’ चालवताना दिसत आहेत. दोघांनी यापूर्वी भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० ट्रॉफीचे अनावरण केले होते.

टी-२० नंतर दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत भिडणार –

टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. शिखर धवन वनडेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल. केन विल्यमसन किवी संघाचे नेतृत्व करेल. ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघ उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. भारत आणि यजमान न्यूझीलंड यांच्यात १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मर्यादित षटकांची मालिका खेळवली जाईल, ज्यामध्ये टी-२० आणि एकदिवसीय मालिका समाविष्ट आहेत.

हेही वाचा – IPL 2023: पोलार्डच्या आयपीएल निवृत्तीनंतर रोहित शर्मा भावूक झाला, फोटो शेअर करून म्हणाला…!

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे वेळापत्रक –

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिला टी-२० सामना शुक्रवारी वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुसरा टी-२० सामना २० नोव्हेंबर रोजी माउंटमनुगेई येथे खेळवला जाईल. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना २२ नोव्हेंबर रोजी नेपियर येथे खेळवला जाणार आहे. तसेच २५ नोव्हेंबरपासून ईडन पार्कवर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे, तर दुसरा एकदिवसीय सामना २७ नोव्हेंबरला सिडॉन पार्कवर, तर तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना ३० नोव्हेंबरला हॅगले ओव्हलवर होणार आहे.