IND vs NZ 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने याआधीच कसोटी मालिका गमावली आहे. भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता क्लीन स्वीप टाळण्यासाठी टीम इंडियाला शेवटचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. यादरम्यान आता भारतीय संघाने अजून एका खेळाडूला मुंबई कसोटीत सामील केले आहे.

लागोपाठ दोन सामन्यांतील मानहानीकारक पराभवानंतर आता भारतीय खेम्यात रणनीतीचा विचार केला जात आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघात मोठे बदल होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत हर्षित राणा खेळताना दिसणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा – IND vs NZ: “सचिन तेंडुलकर ४० व्या वर्षी…”, न्यूझीलंडविरूद्ध अपयशी ठरलेल्या रोहित-विराटला सचिनचं उदाहरण देत चाहत्यांचा तिखट सवाल

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, तिसऱ्या कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा टीम इंडियात समावेश होणार असल्याचे म्हटले जात आहे. असे झाल्यास हर्षित राणाचेही हे आंतरराष्ट्रीय पदार्पण असेल. याआधीही त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण आता अशी शक्यता आहे की १ नोव्हेंबरला तो पदार्पण करत न्यूझीलंडविरूद्ध पदार्पण करू शकतो. अजून याबाबत बीसीसीआयने कोणतेही ऑफिशियल घोषणा केलेली नाही.

हेही वाचा – Virat Kohli-Maxwell: “विराट कोहलीने मला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं होतं…”, मॅक्सवेलने केला मोठा खुलासा, मैदानावरील त्या प्रकरणामुळे भडकलेल्या विराटने…

हर्षित राणा पुढच्या सामन्यासाठी टीम इंडियात दाखल झाला, तर तो खेळताना दिसणार हेही निश्चित आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह किंवा आकाश दीप यांना विश्रांती दिली जाऊ शकते. या मालिकेत आकाश दीप एकच सामना खेळला आहे, मात्र बुमराह सातत्याने खेळत आहे. आता भारताने मालिका गमावली असून पुढील महिन्यापासून टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. त्यासाठी जसप्रीत बुमराह फिट असणं अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे कदाचित बुमराहला विश्रांती देण्यात येईल असे चिन्ह आहे.

Story img Loader