स्टार भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अलीकडच्या काळात मिळालेल्या बहुतेक संधींचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला आहे. परिणामी, अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक हा पुरुषांच्या टी२० विश्वचषकासाठी संघाची पहिली पसंती होता. २५ वर्षीय ऋषभ पंतला स्पर्धेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्येच संधी मिळाली. टी२० विश्वचषकानंतर पंत भारतीय संघासोबत न्यूझीलंडला गेला आणि तिथल्या टी२० मालिकेतही तो अपयशी ठरला. आता या डावखुऱ्या फलंदाजाला माजी भारतीय खेळाडूने ओझे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अष्टपैलू रितिंदर सिंग सोधीच्या मते, भारतीय संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतला संघातून वगळले पाहिजे. तो संघावर ओझे ठरत आहे. ४२ वर्षीय ऋषभच्या मते, संघ व्यवस्थापनाने पंतला आधीच इतक्या संधी दिल्या आहेत की आता संजू सॅमसनसारख्या खेळाडूला आजमावण्याची वेळ आली आहे. इंडिया न्यूजशी खास बातचीत करताना सोधी म्हणाले, “तो टीम इंडियासाठी ओझे बनत आहे. असेल तर संजू सॅमसनला घेऊन या. जेव्हा तुम्ही खूप संधी देता तेव्हा समस्या निर्माण होतात. नवीन लोकांना संधी देण्याची वेळ आली आहे.”

हेही वाचा :   IND vs NZ 1st ODI: प्रतीक्षा संपली! भारताचे दोन वेगवान गोलंदाज उमरान मलिक-अर्शदीप सिंग यांचे एकदिवसीयमध्ये पदार्पण

माजी भारतीय क्रिकेटपटूच्या मते, “पंत हा मॅचविनर आहे पण तो त्या लौकिकाला साजेशी खेळी काही दिवसांपासून करू शकत नाही आहे त्यामुळे तो संघात कितपत टिकू शकेल याबाबत निवडकर्त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. त्याला किती संधी मिळतात आणि किती वेळ मिळतो हे येणारा काळच सांगेल. तुम्ही इतके दिवस एका खेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. जर ते कार्य करत नसेल तर तुम्हाला करावे लागेल. त्याला बाहेरचा रस्ता दाखव.”

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने केला विश्वविक्रम, मेस्सी-मॅराडोनालाही हा टप्पा गाठता आला नाही

भारत-न्यूझीलंड आजच्या एकदिवसीय सामन्यात देखील त्याने लगेच आपली विकेट न्यूझीलंडच्या गोलंदाजांना बहाल केली. भारताच्या सलामीवीरांनी १२४ धावांची शानदार सलामी घागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी भक्कम पाया रचून दिला होता. मात्र ऋषभ पंतने २३ चेंडूत केवळ १५ धावा केल्या आणि तो  लॉकी फर्ग्युसनकरवी खराब फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. संजू सॅमसनचा न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला होता. मात्र त्याची एकाही सामन्यासाठी निवड करण्यात आली नाही. संजू सॅमसन संपूर्ण मालिकेत बेंच वार्मअप करताना दिसला. संजू सॅमसनकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर संघ व्यवस्थापनावर आपला राग काढला होता. आजच्या सामन्यात तो खेळत असून त्याने ३८ चेंडूत ३६ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz hes a burden on the team former indian cricketer makes big statement about rishabh pant avw