IND vs NZ 1st Test Updates India registered a unwanted record against New Zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बंगळुरु येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण भारतीय संघाने फलंदाजी करताना लंच ब्रेकपर्यंत २३.५ षटकानंतर ६ बाद ३४ धावा केल्या आहेत. या दरम्यान टीम इंडियाच्या नावावर १९९० नंतर एका नकोशा विक्रमाची नोद झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला –

३३ धावांवर भारतीय संघाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पाचपैकी तीन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यामध्ये विराट कोहली, सर्फराझ खान केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तर, रोहित दोन धावा करून बाद झाला आणि यशस्वी १३ धावा करून बाद झाला. सध्या ऋषभ पंत (१५) क्रीजवर आहेत. अशा प्रकार भारताने पहिल्या डावात ३४ धावांवर ६ विकेट्स गमावल्या आहेत.

भारताच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद –

१९९० नंतर भारताच्या घरच्या कसोटीत संघाने १० पेक्षा कमी धावांसह तीन विकेट गमावण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. भारताची ही अवस्था न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्यांदा झाली आहे. १९९९ मध्ये मोहालीत भारताने ७ धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. तर २०१० मध्ये अहमदाबादमध्ये १ धावांवर ३ गडी गमावले होते. आज पुन्हा एकदा भारताने १० धावांच्या आत तीन विकेट्स गमावल्या आहे. १० धावा ही २०१८ नंतरची सर्वात लहान धावसंख्या आहे, ज्यावर भारताने तीन विकेट गमावल्या आहेत. सप्टेंबर २०१८ मध्ये भारताने ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध २ धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या.

हेही वाचा – IND vs NZ : विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम; उंचपुऱ्या तरण्याबांड गोलंदाजाने दाखवला तंबूचा रस्ता

पहिल्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराझ खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साऊदी, एजाज पटेल, विल्यम ओ’रुर्के.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz india have registered an unwanted record of losing three wickets for less than 10 runs for the third time against new zealand vbm