India vs New Zealand 3rd Test Day 1 Highlights: भारत-न्यूझीलंड मुंबई कसोटीत भारतीय संघाने पहिल्या दिवशी चांगली सुरूवातीला चांगली कामगिरी केली पण दिवसाअखेर पुन्हा भारताने पुन्हा चाहत्यांना निराश केले. भारतीय संघाने मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंड संघाला २३५ धावांवर रोखले तर प्रत्युत्तरात फलंदाजी करताना भारताने पहिल्याच दिवशी ४ विकेट्स गमावले. भारताने अवघ्या ९ चेंडूत ३ विकेट्स गमावले आणि पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी करताना ४ बाद ८६ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल संघाला चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा एकदा रोहित शर्माने चाहत्यांना निराश केले आहे. रोहित शर्मा १८ चेंडू करत मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालने ५० अधिक धावांची भागीदारी करत संघाचा डाव उचलून धरला. चांगली फलंदाजी करत असलेला जैस्वाल एजाज पटेलच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारायला गेला आणि क्लीन बोल्ड झाला.

IND vs NZ India lost a Test series at home after 12 years
IND vs NZ : पुण्यात पानिपत; १२ वर्षानंतर भारतीय संघाने मायदेशात गमावली कसोटी मालिका
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
IND vs NZ New Zealand set India a target of 359 runs
IND vs NZ : भारताला १२ वर्षांचा विजयरथ कायम राखण्याचे आव्हान, विजयासाठी न्यूझीलंडने दिले ३५९ धावांचे लक्ष्य
Western Australia Just Lose 8 Wickets for Just One Run in Domestic one day cup 6 Batters Goes on Duck vs Tasmania
VIDEO: ५२/२ ते ५३ वर ऑल आऊट, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने एका धावेच्या अंतरात गमावल्या ८ विकेट्स
Washington Sundar 7 wickets and 5 batters bowled records in IND vs NZ 2nd Test
Washington Sundar : त्रिफळाचीत करत ७ विकेट्स आणि खास पराक्रम
What Are 5 Big Reasons of India Defeat Against New Zealand in Bengaluru Test IND vs NZ
IND vs NZ: भारताला न्यूझीलंडविरूद्ध का पत्करावा लागला पराभव? काय आहेत टीम इंडियाच्या पराभावाची ५ कारणं?
India New Zealand Test Series A chance for India to make a comeback in the first Test cricket match sport news
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका: भारताची कडवी झुंज; तब्बल ३५६ धावांच्या पिछाडीनंतर दुसऱ्या डावात फलंदाजांचा प्रतिकार
IND vs NZ 1st Test Match Updates in Marathi Mohammad Kaif on Rohit Sharma
IND vs NZ : रोहित शर्माकडून पहिल्या डावात कुठे झाली सर्वात मोठी चूक? मोहम्मद कैफने स्पष्टच सांगितलं

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव, एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य

पहिल्या दिवसाचा खेळ संपायला अवघे काही मिनिट बाकी होती, त्यामुळे भारतीय संघाने नाईट वॉचमन म्हणून मोहम्मद सिराजला फलंदाजीसाठी पाठवले. पण एजाज पटेलच्या पहिल्याच चेंडूवर तो पायचीत होत बाद झाला. त्यानंतर रचिन रवींद्रच्या पुढील षटकात विराट कोहली फलंदाजी करत होता. ज्याने चौकार लगावत आपले खाते उघडले. पण पुढच्याच चेंडूवर विराट विचित्र पद्धतीने धावबाद झाला. यासह फक्त ९ चेंडूत भारताने ३ विकेट्स गमावले. एका वेळेला मजबूत स्थितीत असलेला भारतीय संघ ७८ वर १ विकेट होता. त्याच भारतीय संघाची २ षटकांत ८६ धावांवर ४ विकेट अशी अवस्था झाली.

हेही वाचा – IND vs NZ: सर्फराझ खानमुळे वैतागलेल्या मिचेलने पंचांकडे केली तक्रार, रोहित शर्मा मात्र युवा खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभा, पाहा काय घडलं?

न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वेने चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण कॉन्वे लवकर पायचीत झाल्याने संघाला मोठा धक्का बसला. लॅथम २८ धावा करत बाद झाला. तर विल यंग ७१ धावा आणि डॅरेल मिचेल यांनी ८२ धावांची उत्कृष्ट खेळी केली. या दोन्ही फलंदाजांशिवाय किवी संघाच्या इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारताच्या फिरकीपुढे हे खेळाडू चांगलेच हतबल दिसले. पण तरीही किवी संघ २३५ धावांचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ५ विकेट्स, वॉशिंग्टन सुंदरने ४ तर आकाशदीपने १ विकेट घेतली. कसोटीतील पहिल्या डावात अश्विनला एकही विकेट मिळवता आली नाही, अश्विनच्या खात्यात विकेट नाही असं पहिल्यांदाच घडलं आहे.

हेही वाचा – INDA vs AUSA: मुकेश कुमारने ६ विकेट्स घेत केला कहर, ऑस्ट्रेलिया अ १९५ वर ऑलआऊट; भारतीय अ संघाने दुसऱ्या दिवशीच घेतला बदला

भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेपूर्वी मुंबई कसोटी जिंकणं खूपच महत्वाचं आहे. ही कसोटी जर टीम इंडियाने गमावली तर त्यांना गुणतालिकेतील पहिले स्थान गमवावे लागू शकते. तर फायनलमध्ये पोहोचण्याचे गणित अधिक गुंतागुंतीचे होणार आहे.

i