India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023: धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट (एचपीसीए) असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकाचा २१वा सामना खेळला जात आहे. खराब आऊटफिल्ड पाहून भारतीय क्रिकेट चाहते कमालीचे निराश झाले आहेत. दोन्ही संघ या सामन्यात आत्मविश्वासाने खेळत आहेत, कारण दोन्ही संघांनी आतापर्यंतचे चारही सामने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध शानदार विजय नोंदवले आहेत.

धरमशाला स्टेडियममधील चाहत्यांना आऊटफिल्ड फारसे चांगले नसल्याचे गेले काही दिवसांपासून जाणवत आहे. कारण, खेळाडूंना क्षेत्ररक्षण करताना खूप अडचण येत आहेत. चाहत्यांनी ट्वीटरद्वारे या प्रकरणावर त्यांचे मत व्यक्त केले. आजच्या सामन्यात देखील क्षेत्ररक्षण करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली. काही काळ तो ड्रेसिंगरूममध्ये गेला होता. याआधीही इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने बीसीसीआयवर या मैदानाच्या आउटफिल्डवरून टीका केली होती. अनेक संघांच्या खेळाडूंना इथे दुखापत झाली आहे. त्यामुळे यावर आता आयसीसी काय विचार करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. एका चाहत्याने लिहिले की, “अतिशय खराब मैदान आणि आऊटफिल्ड आहे, यापेक्षा आमच्या क्लबचे मैदान चांगले आहे.”

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल

पहिल्या डावात काय घडले?

नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला आलेल्या किवी संघाची सुरुवात विशेष झाली नाही. डेव्हॉन कॉनवे खातेही न उघडता सिराजचा बळी ठरला. विल यंगही १७ धावा करून शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. १९ धावांवर दोन गडी बाद झाल्यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडच्या डावाची धुरा सांभाळली. पॉवरप्ले संपल्यानंतर किवी संघाची धावसंख्या ३४/२ होती. न्यूझीलंडची धावसंख्या १३ षटकांत ५० आणि २१ षटकांत १०० पार केली. रवींद्रने ५६ चेंडूत तर मिशेलने ६० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी मिळून न्यूझीलंडची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडची तिसरी विकेट १७८ धावांवर पडली. रवींद्र ७५ धावा करून शमीचा दुसरा बळी ठरला.

हेही वाचा: IND vs NZ: सूर्या-शमीला मिळाली संघात संधी, नाणेफेकीदरम्यान रोहित म्हणाला, “हार्दिक संघात नसला…”

मिशेलने लॅथमसह न्यूझीलंडची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. मात्र, लॅथम पाच धावा करून कुलदीपच्या चेंडूवर बाद झाला, पण मिचेलने स्थिरता दाखवली. त्याने १०० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. कुलदीपने फिलिप्सला २३ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आठ धावा करून चॅपमनही बुमराहचा बळी ठरला. शमीने न्यूझीलंडच्या डावाच्या ४८व्या षटकात सॅन्टनर आणि मॅट हेन्रीला बोल्ड केले. डावाच्या शेवटच्या षटकात त्याने मिशेलला १३० धावांवर बाद केले आणि सामन्यातील पाचवी विकेट घेतली. शेवटी, किवी संघाला ५० षटकात सर्व गडी गमावून २७३ धावा करता आल्या. भारताकडून शमीच्या पाच विकेट्सव्यतिरिक्त कुलदीपने दोन आणि बुमराह-सिराजने प्रत्येकी एक गडी बाद केला.

खराब सुरुवातीनंतर कुलदीपचे पुनरागमन

या सामन्यात रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी सुरुवातीपासूनच कुलदीप यादववर दडपण आणले होते. किवी फलंदाजांनी आपल्या पहिल्याच षटकात खूप धावा केल्या होत्या. या कारणास्तव कुलदीपने पहिल्या पाच षटकात एकही विकेट घेऊ शकला नाही. मात्र, नंतर त्याने त्यांच्यावरचं दबाव निर्माण केला आणि दोन विकेट्सही घेतल्या. याशिवाय त्याने इतर गोलंदाजांना चांगले सहकार्य केले. त्याच्या शेवटच्या पाच षटकांमध्ये त्याने २५ धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या.

हेही वाचा: IND vs NZ: IND vs NZ: मोहम्मद शमीचे दमदार पुनरागमन, विश्वचषकात इतिहास रचला; अनिल कुंबळेचाही मोडला विक्रम

मोहम्मद शमीची शानदार कामगिरी

या विश्वचषकात मोहम्मद शमीला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने पहिल्याच चेंडूवर विल यंगला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर क्रिझवर स्थिरावलेल्या रचिन रवींद्रला बाद करत १५९ धावांची भागीदारी तोडली. शेवटी त्याने तीन विकेट्स घेत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. त्याने १० षटकात ५४ धावा देत पाच विकेट्सही घेतल्या.

Story img Loader