भारतीय संघाविरुद्ध टी-२० मालिका गमावल्यानंतर, न्यूझीलंडच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन चौथ्या टी-२० सामन्यातून बाहेर पडला आहे. विल्यमसनच्या डाव्या खांद्याला दुखापत झालेली आहे, त्याच्या बदली संघातला अनुभवी गोलंदाज टीम साऊदी चौथ्या सामन्यात न्यूझीलंडचं नेतृत्व करेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिसऱ्या टी-२० सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान विल्यमसनला ही दुखापत झाली होती. मात्र चौथ्या टी-२० सामन्यात विल्यमसन खेळू शकला नसला तरीही अखेरच्या टी-२० सामन्यापर्यंत तो पुनरागमन करेल अशी माहिती, न्यूझीलंडच्या संघ व्यवस्थापनाने दिली आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या धरतीवर भारतीय संघाने टी-२० मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत न्यूझीलंडचा संघ कसं पुनरागमन करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz kane williamson ruled out of 4th t20 due to shoulder injury psd