IND vs NZ 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटची कसोटी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या सामन्यापूर्वी किवी संघाला धक्का बसला असून, तिसऱ्या कसोटीतून हा अनुभवी फलंदाज बाहेर पडला आहे. मालिकेतील शेवटच्या कसोटीपूर्वी किवी संघाला हा धक्का बसला असून, अनुभवी फलंदाज केन विल्यमसनला तिसरी कसोटीही खेळता येणार नाही. विल्यमसन दुखापतीमुळे बेंगळुरू आणि पुण्यातील कसोटीत खेळू शकला नाही.
विल्यमसन बेंगळुरू आणि पुण्यातील पहिल्या दोन कसोटीतही खेळू शकला नाही. श्रीलंका दौऱ्यात त्याच्या मांडीला दुखापत झाली होती. हेगले ओव्हल येथे २८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेदरम्यान केन पुनरागमन करण्याची शक्यता आहे. या सिनियर फलंदाजाच्या अनुपस्थितीत, टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने भारतात पहिली कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला.
न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले की, “विलियमसनने चांगली प्रगती केली आहे, परंतु सावधगिरी बाळगल्याने तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होईल.” केन त्याच्या दुखापतीतून सावरत आहे, पण पूर्णपणे संघात खेळण्यासाठी तो तयार नाही,” असे प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले. तो दुखापतीतून लवकर सावरेल असे चिन्ह असताना आम्हाला वाटते की तो न्यूझीलंडमध्ये राहणं आणि त्याच्या पुनर्वसनाच्या अंतिम टप्प्यावर लक्ष केंद्रित करणं त्याच्यासाठी चांगले आहे जेणेकरून तो इंग्लंडविरूद्ध मालिकेसाठी तयार होऊ शकेल. इंग्लंड मालिकेला अजून एक महिना बाकी आहे. म्हणून आता सावध दृष्टिकोन स्वीकारल्यास तो क्राइस्टचर्चमधील पहिल्या कसोटीसाठी तो मैदानात उतरेल.
न्यूझीलंडने बेंगळुरू आणि पुणे कसोटी जिंकून प्रथमच भारतात कसोटी मालिका जिंकली आहे. टीम साऊदीने अलीकडेच कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर टॉम लॅथम पहिल्यांदाच कायमस्वरूपी कर्णधारपदाची सूत्रे हाती घेत आहे. न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत भारताला पहिल्या डावात ४६ धावांत गुंडाळत अखेरीस आठ गडी राखून पराभूत केले. तर दुसऱ्या कसोटीत भारतावर ११३ धावांनी विजय नोंदवला.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरी कसोटी १ नोव्हेंबरपासून मुंबईत सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC फायनल) नुसार भारतासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.