IND vs NZ Live Streaming Details and Schedule: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील निर्भेळ विजयानंतर आता भारताची नजर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत सध्या अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही भारताने आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली तर संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणार हे जवळपास निश्चित होईल. न्यूझीलंड मालिकेनंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

भारत वि न्यूझीलंड पहिला कसोटी सामना एम ए चिन्नास्वामी स्टेडियमवर १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. बेंगळुरूनंतर मालिकेतील दुसरा कसोटी सामना २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात खेळवली जाणार आहे. त्याचवेळी मालिकेतील तिसरा सामना मुंबईत १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण ६२ कसोटी सामने खेळले गेले आहेत ज्यात भारताने २२ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर १३ सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात किवी संघाला यश आले आहे. याशिवाय दोन्ही संघांमधील २७ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

हेही वाचा – Rohit Sharma on Mohammed Shami: “शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणं शक्य नाही…”, रोहित शर्माने मोहम्मद शमीबद्दल केलं मोठं वक्तव्य, कर्णधार नेमकं काय म्हणाला?

भारत वि न्यूझीलंड कसोटी सामन्याचे वेळापत्रक (India vs New Zealand Test Series Schedule)

पहिला कसोटी सामना – १६ ते २० ऑक्टोबर, सकाळी ९.३० वा., बंगळुरू
दुसरा कसोटी सामना – २४ ते २८ ऑक्टोबर, सकाळी ९.३० वा., पुणे
तिसरा कसोटी सामना – १ ते ५ नोव्हेंबर, सकाळी ९.३० वा., मुंबई

भारत वि न्यूझीलंड कसोटी सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग (Where to Watch Indian Cricket Team vs New Zealand Cricket Team Test)

भारत वि न्यूझीलंड याच्यात भारतात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हे तिन्ही कसोटी सामने सकाळी ९.३० वाजता सुरू होतील. तर ९ वाजता सामन्याची नाणेफेक होईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 या स्पोर्ट्स चॅनेलवर होईल. तर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर मोफत पाहता येईल.

हेही वाचा – Ranji Trophy: कोण आहे गुरजपनीत सिंह? विराट कोहलीच्या सल्ल्याने चेतेश्वर पुजाराला रणजी ट्रॉफीमध्ये केलं आऊट, ठरला तमिळनाडूच्या विजयाचा हिरो

भारत वि न्यूझीलंड कसोटीसाठी दोन्ही संघ

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

न्यूझीलंड संघ

टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (केवळ पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ’रूर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, इश सोधी (केवळ दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साऊदी, केन विल्यमसन, विल यंग