India vs Pakistan ICC Champions Trophy 2025 Live Match Updates: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या गट टप्प्यातील अखेरचा सामना आज अ गटातील भारत वि. न्यूझीलंड या संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४४ धावांनी शानदार विजय मिळवला. श्रेयस अय्यरची ८९ धावांची खेळी आणि वरूण चक्रवर्तीचे ५ विकेट्स सामन्याचे निर्णयाक क्षण ठरले. भारत वि. न्यूझीलंड सामन्याच्या निकालासह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील संघही निश्चित झाले आहेत. भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध तर न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सेमीफायनल खेळणार आहे.
India vs new zealand Highlights: भारत वि. न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचे हायलाईट्स
भारताचा न्यूझीलंडवर नेत्रदिपक विजय! ‘या’ संघाविरूद्ध खेळणार उपांत्य फेरी
भारताने न्यूझीलंडला अटीतटीच्या सामन्यात वरूण चक्रवर्तीचे ५ विकेट्स आणि फिरकी गोलंदाजीच्या जोरावर नमवत शानदार विजय मिळवला आहे.
IND vs NZ Updates : न्यूझीलंडचा संघ क्लीन बोल्ड, भारताचे फिरकीपटू ठरले स्टार; भारताचा दणदणीत विजय
IND vs NZ Updates : आज चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अखेरचा सामना भारत वि.न्यूझीलंड खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ क्लीन बोल्ड झाला, भारताचे फिरकीपटू स्टार ठरले असून भारताचा दणदणीत विजय झाला आहे.
केन विल्यमसन बाद
अक्षर पटेलने १० षटकं चांगल्या लाईन आणि लेंग्थने गोलंदाजी करत फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली नाही, पण अक्षरला विकेटही नाही मिळाली. पण त्याच्या स्पेलमधील १०व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर त्याने ८१ धावांवर खेळत असलेल्या केन विल्यमसनला बाद केलं. केएल राहुलने स्टंपिंग केल्याने विल्यमसन बाद झाला. यासह न्यूझीलंडला विजयासाठी ४८ चेंडूत ७४ धावांची गरज आहे.
मायकेल ब्रेसवेल पायचीत
भारताच्या डावातील ३८व्या षटकातील वरूण चक्रवर्तीने पहिल्या चेंडूवर मायकेल ब्रेसवेलला पायचीत करत संघाने सहावी विकेट मिळवली. यासह न्यूझीलंडने ३९ षटकांत ६ बाद १६२ धावा केल्या आहेत.
फिलिप्स पायचीत
भारताच्या ३६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जबरदस्त फिल्डर आणि मोठमोठे फटके मारणाऱ्या फिलिप्सने आपली वादळी अंदाज दाखवत षटकार खेचला. वरूण चक्रवर्ती भारताचा एक कमालीचा फिरकीपटू आहे, पण त्याने त्याच्याच चेंडूवर षटकार मारत दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण वरूणने पुढच्याच चेंडूवर त्याला पायचीत करत भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. यासह न्यूझीलंडला विजयासाठी ८४ चेंडूत ९८ धावांची गरज आहे.
जडेजाच्या खात्यात विकेट
रवींद्र जडेजाने ३३ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर पहिली विकेट मिळवली, पण संघाला मात्र चौथी विकेट मिळवून दिली. टॉम लॅथमला स्वस्तात बाद केलं आहे.
केन विल्यमसनचे अर्धशतक
भारताच्या फिरकीसमोर टिकून राहणाऱ्या केन विल्यसमनने ७७ चेंडूत ५चौकारांसह ५१ धावा करत आपले अर्धशतक झळकावले आहे.
कुलदीप यादवने किवींचा भारताविरूद्धच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा डॅरिल मिचेल स्वस्तात बाद झाला. भारताच्या जबरदस्त फिरकी गोलंदाजीपुढे किवी फलंदाज निष्प्रभ ठरले. फलंदाज मैदानात होते खरे पण त्यांना धावा करणं फार कठिण होते. यासह किवीने २६ षटकांत १०० धावा केल्या.
वरूणने १०व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विल यंगला क्लीन बोल्ड करत संघाला दुसरी तर आयसीसी टूर्नामेंटमधील आपली विकेट मिळवली आहे. यासह न्यूझीलंडने १२ षटकानंतर २ बाद ४९ धावा केल्या आहेत.
भारताच्या खात्यात पहिली विकेट
हार्दिक पंड्याच्या चौथ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर रचिन रवींद्र झेलबाद झाला आहे. हार्दिकने टाकलेल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हवेतील चेंडू रचिनने मारला आणि सीमारेषेजवळ अक्षर पटेलने कमालीचा झेल टिपला.
https://twitter.com/StarSportsIndia/status/1896191161309757731
न्यूझीलंडच्या डावाला सुरूवात
भारताने दिलेल्या २५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडचे सलामीवीर मैदानात उतरले आहेत. डेव्हॉन कॉन्वे संघात नसल्याने विल यंग आणि रचिन रवींद्रची जोडी मैदानात उतरली आहे. न्यूझीलंडने २ षटकांत ९ धावा केल्या आहेत.
कसं असणार सेमीफायनलचं गणित
भारत-न्यूझीलंड सामन्याच्या निकालावरून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सेमीफायनलचं गणित स्पष्ट होणार आहे. भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ कोणाविरूद्ध भिडणार हे आज निश्चित होईल.
भारत-न्यूझीलंड सामन्यातील विजेता संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध सेमीफायनल खेळेल.
भारत-न्यूझीलंड सामन्यातील पराभूत संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सेमीफायनल खेळेल.
भारत ४ मार्चला दुबईत सेमीफायनल खेळेल
तर दुसरी सेमीफायनल ५ मार्चला पाकिस्तान लाहोरमध्ये होईल.
भारताने किवींना विजयासाठी दिले इतक्या धावांचे लक्ष्य
भारताने श्रेयस अय्यरच्या ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत ९ विकेट गमावत २४९ धावा केल्या आहेत. यासह भारताने न्यूझीलंडला २५० धावांचे विजयासाठी लक्ष्य दिले आहे. श्रेयस अय्यरने ७९ धावांची, अक्षर पटेलने ४२ धावांचे तर हार्दिक पंड्याने ४५ धावांचे योगदान देत संघाचा डाव सावरला. भारतावे एकेकाळी ३० धावांत ३ विकेट गमावले होते, पण अक्षर-श्रेयसच्या ९८ धावांच्या भागीदारीने भारताचा डाव सावरला.
हार्दिक पंड्याची महत्त्वपूर्ण खेळी संपुष्टात
हार्दिक पंड्या ४५ चेंडूत ४५ धावा करत महत्त्वपूर्ण योगदान देत माघारी परतला. हार्दिकने ४९व्या षटकात १० धावा करत संघाला २५० धावांच्या जवळ नेऊन ठेवले.
भारताला सातवा धक्का
४६व्या षटकातील पाचव्या चेंडूवर केन विल्यमसनने एक कमालीचा झेल टिपत जडेजाला झेलबाद केले. यासह भारताने ४६ षटकांत ७ बाद २२३ धावा केल्या आहेत. ग्लेन फिलिप्सनंतर केन विल्यमसनने एक कमालीचा झेल टिपला आहे.
केएल राहुल स्वस्तात झेलबाद
केएल राहुल मोठा फटका खेळण्याच्या नादात स्टंप्सच्या मागे सँटनरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यासह भारताने ४० षटकांत ६ बाद १८५ धावा केल्या आहेत.
श्रेयस अय्यर झेलबाद
भारताचा डाव सावरणारा श्रेयस अय्यर ७९ धावा करत झेलबाद झाला. शॉर्ट चेंडूवर पूल शॉट खेळण्याच्या नादात विल्यम ओरूकच्या ३७व्या षटकात विल यंगने झेल टिपत त्याला माघारी धाडले. यासह भारताने ३७ षटकांत ५ बाद १७३ धावा केल्या आहेत. श्रेयसच्या विकेटनंतर हार्दिक पंड्या मैदानात आला आहे.
९८ धावांची भागीदारी संपुष्टात
श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने संघाचा डाव सावरत ९८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पण रचिन रवींद्रने ३०व्या षटकात ही भागीदारी तोडली. ३० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अक्षर महत्त्वपूर्ण ४२ धावा झेलबाद झाला. यासह भारताने ३० षटकांत ४ बाद १३० धावा केल्या आहेत.
श्रेयस अय्यरचं अर्धशतक
श्रेयस अय्यरने ४ चौकारांसह ७५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. अक्षर पटेलच्या साथीने श्रेयसने भारताचा डाव सावरत धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला. यासह भारताने २९ चेंडूत ३ बाद १२७ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील हे सलग दुसरे अर्धशतक आहे.
भारताने गाठला १०० धावांचा पल्ला
श्रेयस अय्यरची ४० धावांची खेळी आणि अक्षर पटेलच्या २६ धावांच्या खेळीसह भारताने २५ षटकांत १०० धावांचा पल्ला गाठला आहे. भारताने सलग ३ विकेट गमावल्यानंतर अय्यर आणि अक्षरच्या जोडीने न्यूझीलंडविरूद्ध सकारात्मक फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. यासह या दोन्ही खेळाडूंमध्ये ११० चेंडूत ७४ धावांची भागीदारी झाली आहे.
सलग ३ विकेट गमावल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने भारताचा डाव सावरला आहे. दोन्ही फलंदाजांनी सावध फलंदाजी करत संघाला ७५ धावांचा टप्पा गाठून दिला आहे. श्रेयसने एका षटकात ३ चौकार मारत भारताचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. यासह भारताने २० षटकांत ३ बाद ७८ धावा केल्या आहेत.
विराटही झेलबाद
आपल्या वनडे कारकिर्दीतील ३००वा वनडे सामना खेळत असलेल्या विराट कोहलीला ११ धावांवर माघारी परतावे लागले आहे. मॅट हेन्रीच्या सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहली झेलबाद झाला आहे. ग्लेन फिलिप्सने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे उदारहण दाखवत कमालीचा झेल टिपला.
भारताला दुसरा धक्का
भारतीय संघाला रोहित शर्माच्या रूपात दुसरा धक्का बसला आहे. काईली जेमिसनने टाकलेल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोहितने चेंडू उडवला पण बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागल्याने नीट कनेक्शन न होता मिड विकेटवर असलेल्या खेळाडूच्या हातात चेंडू गेला आणि रोहित झेलबाद झाला.
भारतीय संघाचा तुफान फॉर्मात असलेला सलामीवीर शुबमन गिल तिसऱ्याच षटकात स्वस्तात बाद झाला आहे. मॅट हेन्रीच्या तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर गिल पायचीत झालाय. रिव्ह्यू घेण्यात आला पण गिलला बाद देण्यात आले. यासह भारताने ३ षटकांत १५ धावा करत एक विकेट गमावली आहे.
भारताच्या फलंदाजीला सुरूवात
नाणेफेक गमावून भारतीय संघ फलंदाजीला उतरला आहे. वनडेमधील भारताची जबरदस्त सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुबमन गिल मैदानात उतरले आहेत.
भारतीय संघाचा रनमशीन फलंदाज विराट कोहलीचा हा ३०० वा वनडे सामना असणार आहे. या सामन्यात विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. दुबईत हजारोंच्या संख्येने आलेले चाहते विराटला त्याच्या ३००व्या सामन्यात शतक करताना पाहायचे असल्याचे सर्वांनी व्यक्त केले.
न्यूझीलंडविरूद्ध सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणाला विश्रांती दिली असून फिरकीपटू वरूण चक्रवर्तीला संघात संधी देण्यात आली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरूक
भारत वि. न्यूझीलंड सामन्याची नाणेफेक न्यूझीलंडने जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत प्रथमच फलंदाजी करणार आहे. न्यूझीलंड संघामध्ये एक बदल झाला असून डॅरिल मिचेल संघात परतला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच विराट कोहली इतिहास रचणार आहे. विराट कोहली त्याच्या वनडे कारकिर्दीतील ३०० वा वनडे सामना खेळणार आहे. कोहलीपूर्वी ३०० वनडे खेळलेल्या भारतीयांमध्ये सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांचा समावेश आहे.