India vs Pakistan ICC Champions Trophy 2025 Live Match Updates: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या गट टप्प्यातील अखेरचा सामना आज अ गटातील भारत वि. न्यूझीलंड या संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४४ धावांनी शानदार विजय मिळवला. श्रेयस अय्यरची ८९ धावांची खेळी आणि वरूण चक्रवर्तीचे ५ विकेट्स सामन्याचे निर्णयाक क्षण ठरले. भारत वि. न्यूझीलंड सामन्याच्या निकालासह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील संघही निश्चित झाले आहेत. भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध तर न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सेमीफायनल खेळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

India vs new zealand Highlights: भारत वि. न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचे हायलाईट्स

13:22 (IST) 2 Mar 2025

अ गटात अव्वल कोण?

दुबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना उपांत्य फेरीच्या तिकिटासाठी नसला तरी गुणतालिकेत अव्वल स्थानावर कोण येईल यासाठी महत्त्वाचा आहे. हे दोन्ही संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहेत आणि उपांत्य फेरीसाठी आधीच पात्र ठरले आहेत. आता अ गटात अव्वल कोण? यासाठी ही लढत महत्त्वाची असणार.

India vs New Zealand Highlights: भारताने न्यूझीलंडवर ४४ धावांनी विजय मिळवत अ गटाच्या गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे.