ICC World Cup How Much Money Each Team Earned: आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ ही स्पर्धा शेवटच्या तीन सामन्यांच्या टप्यात पोहोचली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात जिंकणारे संघ येत्या रविवारी म्हणजेच १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक अंतिम फेरीत आमनेसामने लढतील. आयसीसी विश्वचषक ट्रॉफीशिवाय विजेत्या संघाला बक्षिसाची मोठी रक्कम सुद्धा कमावता येणार आहे. आयसीसीने स्पर्धेच्या घोषणेच्या वेळी दिलेल्या माहितीनुसातर विश्वचषक विजेत्या संघाला तब्बल ४०,००,००० डॉलर्स म्हणजेच ३३ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. इतकंच नव्हे तर आज व उद्याच्या उपांत्य फेरीतील पराभूत संघाला सुद्धा मोठी कमाई करता येणार आहे.

विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका आणि नेदरलँड, जे उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत त्यांना प्रत्येकी १ लाख डॉलर्स (अंदाजे ८४ लाख रुपये) मिळणार आहेत. तर लीग सामना जिंकल्याबद्दल, संघाला ४०,००० डॉलर्स (अंदाजे ३३ लाख रुपये) बक्षीस देण्यात येणार आहे.

ICC Champions Trophy History and Records in Marathi
Champions Trophy History: आधी २ मग ४ आणि आता तब्बल ८ वर्षांनी होतेय चॅम्पियन्स ट्रॉफी! विस्कळीत स्पर्धेची गोष्ट ठाऊक आहे का?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Ajinkya Rahane Century in Ranji Trophy Quarterfinal Mumbai vs Haryana Hits 41st First Class Hundred
Ranji Trophy: मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेचं शानदार शतक, रणजीच्या उपांत्यपूर्व फेरीत केली मोठी कामगिरी
Champions Trophy Corbin Bosch replaces injured Anrich Nortje in South Africa's Squad
Champions Trophy: फक्त एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात दाखल, संघाने केली मोठी घोषणा
Pak pm Shehbaz Sharif on champions trophy
जेतेपद मिळविण्याइतकेच भारताला हरविणे महत्त्वाचे!पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांचे वक्तव्य
union sports ministry create controversy over cash prizes
किशोर, कुमार खेळाडूंना रोख पारितोषिकांतून वगळले!ईस्पोर्ट्स, ब्रेक डान्सिंग मात्र पुरस्कारासाठी पात्र
Half Marathon competition in Baramati on February 16 Pune news
१६ फेब्रुवारीला बारामतीत हाफ मॅरेथॉन स्पर्धा
Indias Champions Trophy 2025 matches General ticket sale date and timing Announced by ICC
Champions Trophy Tickets: चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यासाठी तिकीटं ३ हजारांच्या आत, IND vs PAK सामन्याची तिकीट विक्री कधी सुरू होणार? ICCने केली घोषणा

उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी ८ लाख डॉलर्स (अंदाजे ६ कोटी रुपये) आणि अंतिम फेरीतील उपविजेत्या संघांना २० लाख डॉलर्स (अंदाजे रु. १६ कोटी) मिळतील. ICC पुरुष विश्वचषक २०२३ च्या विजेत्याला प्रतिष्ठित विश्वचषक ट्रॉफीसह तब्बल ४० लाख डॉलर्स (अंदाजे 33 कोटी रुपये) मिळणार आहेत.

ICC विश्वचषक २०२३ मध्ये कोणत्या संघाने किती कमाई केली?

संघ विजयी सामने बक्षीस (डॉलर्स)बक्षीस (रुपये)
भारत9३.६० लाख डॉलर्स२ कोटी ८८ लाख
दक्षिण आफ्रिका7२.८० लाख डॉलर्स२ कोटी २४ लाख
ऑस्ट्रेलिया7२.८० लाख डॉलर्स२ कोटी २४ लाख
न्यूझीलंड 5२ लाख डॉलर्स१ कोटी ६० लाख
पाकिस्तान4२. ६० लाख डॉलर्स२ कोटी ८ लाख
अफगाणिस्तान4२. ६० लाख डॉलर्स२ कोटी ८ लाख
इंग्लंड3२. २० लाख डॉलर्स१ कोटी ७६ लाख
बांगलादेश2१. ८० लाख डॉलर्स १ कोटी ४४ लाख
श्रीलंका2१. ८० लाख डॉलर्स १ कोटी ४४ लाख
नेदरलँड2१. ८० लाख डॉलर्स १ कोटी ४४ लाख

हे ही वाचा<< IND vs NZ: रोहित शर्माने सांगितली, वानखेडेवर ‘टॉस’ ची भूमिका! भारतासाठी आज कोणती निवड असेल फायदेशीर?

विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विश्वचषक स्पर्धेसाठी १० दशलक्ष डॉलर्सची एकूण बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती. प्रत्येक सहभागी संघाला याचा वाटा मिळणार आहे.

Story img Loader