IND vs NZ Madan Lal raise questions on Team India : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे भारताने १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली. माजी भारतीय क्रिकेटपटू मदन लाल यांनी टीम इंडियाच्या पुण्यातील लाजिरवाण्या पराभवामागचे कारण स्पष्ट केले. संघाच्या कामगिरीचा आढावा घेताना ते म्हणाले की, टॉप ऑर्डरने मायदेशातील परिस्थितीत चांगली फलंदाजी करायला हवी होती. या सामन्यात न्यूझीलंडने ३५९ धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात भारतीय संघ २४५ धावांवर गारद झाला.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताच्या टॉप ऑर्डरच्या तीन फलंदाजांनी मिळून ६० धावा केल्या, तर दुसऱ्या डावात टॉप ऑर्डरच्या तीन फलंदाजांची एकूण धावसंख्या १०८ धावा होती. घरच्या मैदानावर खेळण्याच्या फायद्यावर बोलताना १९८३ चे विश्वचषक विजेते खेळाडू मदन लाल म्हणाले, “आपण सहसा घरच्या मैदानावर मालिका जिंकतो. कारण परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल असते. खेळपट्ट्या आपल्या शैलीला अनुकूल असतात आणि येथे खेळण्याची अधिक सवय आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारत वरचढ असतो.”

Ishan Kishan Father Pranav Pandey Set To Join Nitish Kumar JDU Today Know About Him
Ishan Kishan Father: इशान किशनचे वडील ‘या’ पक्षात करणार प्रवेश, जाणून घ्या कोण आहेत प्रणव कुमार पांडे?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
BCCI in Action Mode After India Streak Ending Defeat in Pune said No Optional Training Ahead of IND vs NZ Mumbai Test
IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…
NCP Candidate List
NCP Candidate 3rd List : मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली उमेदवारी?
Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh sexual harassment
Sakshi Malik: “ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या बेडवर मला…”, लैंगिक अत्याचार प्रकरणी साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
Khar Gymkhana Cancel Cricketer Jemimah Rodrigues Membership
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जचं खार जिमखाना सदस्यत्व रद्द; वडिलांतर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रमांमुळे कारवाई
Samson's disclosure about Rohit Sharma
Sanju Samson : मी फायनल खेळणार होतो पण टॉसच्या आधी १० मिनिटं… संजू सॅमसनने सांगितला किस्सा
Uddhav Thackeray on Dahisar vidhansabha
Vinod Ghosalkar : मोठी बातमी! ठाकरेंनी मुंबईत उमेदवार बदलला; दहिसरमध्ये तासाभरात नेमकं काय घडलं?

मदन लाल काय म्हणाले?

c

मात्र, पुण्यात ज्या पद्धतीने खेळपट्टी तयार करण्यात आली, त्याबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली. त्याचबरोबर त्यामागील तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कारण ही खेळपट्टी भारतीय गोलंदाजांना फारशी मदत करू शकली नाही. त्यामुळे माजी खेळाडू पुढे म्हणाला, “याला आम्ही स्वतः जबाबदार आहोत. अशी खेळपट्टी बनवण्यात काही अर्थ नव्हता. अशी खेळपट्टी तयार करण्याचा कोणाचा हट्ट होता? हे मला माहीत नाही. हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय होता की अन्य कोणाचा?”

हेही वाचा – Gautam Gambhir : मालिका गमावल्यानंतर गौतम गंभीरचा ‘तो’ VIDEO व्हायरल, रवी शास्त्रींच्या वक्तव्यानंतर होतोय ट्रोल, काय आहे प्रकरण?

‘आपण स्वत:च्याच जाळ्यात अडकलो’ –

u

मदन लाल गोलंदाजीबद्दल पुढे म्हणाले, “तुमच्याकडे एक मजबूत संघ आहे, ज्यात वेगवान आक्रमण आणि उत्कृष्ट फिरकी आक्रमण आहे. तरीही आपण या खेळपट्ट्या बनवल्या आणि स्वत:च्याच जाळ्यात अडकलो. चांगल्या खेळपट्टीवर आपण निश्चितपणे कसोटी सामना जिंकू शकलो असतो. दुसरे कारण म्हणजे आपण चांगली फलंदाजी केली नाही. आपल्या टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी केली नाही. जेव्हा आमचे फलंदाज टॉप ऑर्डरमधील पाच किंवा सहा क्रमांकावर चांगली कामगिरी करतात, तेव्हा आपण कसोटी सामने जिंकतो. कारण परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल असल्याने गोलंदाजीत नेहमीच पर्याय असतात.”

हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीने आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात असं काही केलं की… VIDEO होतोय व्हायरल

‘मी जास्त काही बोलणार नाही, पण…’ –

मदन लाल पुढे म्हणाले, “मी जास्त काही बोलणार नाही, पण जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करत नाही तेव्हा लोक टीका करत राहणार. यात काही शंका नाही. तुम्ही धावा केल्यावर जे लोक तुमची स्तुती करतात, तेच लोक तुम्ही खराब फॉर्ममध्ये असताना टीका करतात. जैस्वाल सारख्या युवा खेळाडूंनी धावा केल्या आणि रवींद्र जडेजा यांनीही योगदान दिले, परंतु केवळ एक किंवा दोन फलंदाजांच्या जोरावर तुम्ही जिंकू शकत नाही. टॉप ऑर्डरला एक युनिट म्हणून काम करावे लागेल. कारण यशस्वी होण्यासाठी अधिक सातत्यपूर्ण कामगिरी करणे आवश्यक आहे.”