India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना सर्वात मोठा सामना मानला जात होता. पण टीम इंडियाने या सामन्यात आतापर्यंत हार्दिक पांड्याशिवाय दमदार कामगिरी केली आहे. एकेकाळी न्यूझीलंडचा संघ ३०० च्या वर धावा करताना दिसत होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत किवी संघाला २७३ धावांवर रोखले. मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या. यानंतर रोहित शर्माने पुन्हा वेगवान सुरुवात करत ४० चेंडूत ४६ धावा केल्या आणि भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर विराट कोहलीने ९५ धावांची खेळी करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला.अशा प्रकारे भारतीय संघाने २० वर्षानंतर न्यूझीलंडवर ४ गडी राखून ऐतिहासिक विजय नोंदवला.दरम्यान, स्टँडमधील एका भारतीय चाहत्याचा फोटो व्हायरल झाला आहे, जो टीम इंडियाला खास पोस्टरसह चीअर करत होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा