IND vs NZ Mitchell Santner Throws Ball At Mohammed Shami: भारत न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात अटीतटीची लढत सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना २४९ धावा करत किवींना विजयासाठी २५० धावांचे लक्ष्य दिले आहे. तर भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर किवी फलंदाजही धावा काढण्यासाठी मोठे प्रयत्न करताना दिसत आहेत. पण यापूर्वी मिचेल सँटनरने भारताच्या डावात मोहम्मद शमीला चेंडू फेकून मारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही काळापासून फिटनेसच्या समस्येशी झुंजत होता. यानंतर पाकिस्तानविरूद्ध सामन्यात पायाच्या समस्येमुळे तो काही काळ मैदानापासून दूर होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याला घोट्याचा त्रास झाला होता. पण आता न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शमीला पाठीला चेंडू लागला. फलंदाजीदरम्यान मोहम्मद शमीच्या पाठीवर थेट थ्रो लागला. यानंतर त्याला खूप वेदना होत असल्याचे दिसले.

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने मोहम्मद शमी धाव घेत असताना बॅटिंग एंडच्या दिशेने चेंडू मारला जो चेंडू शमीच्या उजव्या हाताच्या खांद्याला लागला. ही घटना भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात घडली. शमीने ५ वा चेंडू डीपमध्ये खेळला आणि दोन धावा केल्या. दुसरी धाव घेताना सँटनरचा थ्रो आला. शमी विकेटपासून दूर पळत होता. सँटनरने थेट पाठीवर चेंडू मारला आणि शमी चांगलाच कळवला. तर फिजिओने येऊन शमीच्या हाताची हालचाल केली. यानंतर शमी अखेरचा चेंडू खेळला.

यानंतर मोहम्मद शमी भारताकडून गोलंदाजीही करताना दिसला. शमीने ३ षटकं टाकली, पण नंतर क्षेत्ररक्षण करताना शमीला त्रास होत असल्याचे दिसले. तो पाठ पकडून चालताना दिसला. तर फिजिओने सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना फिजिओेने त्याच्या पाठीला जेल लावतानाही पाहायला मिळाले.