IND vs NZ Mohammad Kaif tweet on Rohit Sharma and team India : भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील यजमान संघ पहिल्या दिवसापासून आपला दबदबा कायम ठेवेल, असे मानले जात होते. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात असून, पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि येथूनच रोहित आणि कंपनीचा वाईट काळही सुरू झाला. भारताचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला. यानंतर माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने सांगितले की, या सामन्यात रोहितकडून सर्वात मोठी चूक कुठे झाली?

मोहम्मद कैफ काय म्हणाला?

मोहम्मद कैफने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तो म्हणाला, ‘जेव्हा खेळपट्टी दीर्घकाळ झाकलेली असते, तेव्हा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणे योग्य नसते. खेळपट्टीवर ओलावा निर्माण होतो. कदाचित टीम इंडियाने ही युक्ती इथे मिस केली असेल. पण न्यूझीलंडचे अप्रतिम झेल आणि गोलंदाजी करताना, ज्या प्रकारे अचूक लाइन लेन्थवर गोलंदाजी केली, त्याचे खरंच कौतुक करायला हवे.’

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय
England Beat New Zealand by 323 Runs in 2nd Test and win Series Joe Root Harry Brook Century
NZ vs ENG: न्यूझीलंडचा मोठा पराभव! टीम इंडियाला चीतपट करणाऱ्या किवींची घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर शरणागती
India vs Australia Border Gavaskar Trophy Australia dominate in second Test sport news
पिछाडीनंतर पडझड, भारतीय फलंदाजांकडून निराशाच; हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा दबदबा

न्यूझीलंडसाठी मॅट हेन्री हिरो ठरला, त्याने पाच विकेट्स घेतल्या, तर भारतासाठी ऋषभ पंत सर्वाधिरक धावा करणारा फलंदाज ठरला. ऋषभ पंतने २० धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय यशस्वी जैस्वाल हा एकमेव फलंदाज होता जो दुहेरी आकडा गाठू शकला. तो १३ धावांवर बाद झाला. भारतीय खेळपट्ट्यांवर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे.
भारताकडून विराट कोहली, केएल राहुल, सर्फराझ खान, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना खातेही उघडता आले नाही.

हेही वाचा – IND vs NZ : विराटने शून्यावर बाद होऊनही मोडला धोनीचा मोठा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

डेव्हॉन कॉनवेचे हुकले शतक –

आशियाई खेळपट्ट्यांवर भारतातीलच नव्हे तर कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. आता या कसोटी सामन्यात पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघाला चमत्कार करावा लागणार आहे, कारण सध्या न्यूझीलंडची स्थिती अतिशय मजबूत आहे. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने शानदार फलंदाजी करणाऱ्या डेव्हॉन कॉनवेला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्यामुळे कॉनवेला आपले शतक पूर्ण करता आले नाही. त्याने १०५ चेंडूत ९१ धावा करून तो बाद झाला. अश्विनच्या चेंडूवर कॉनवेने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट विकेटवर गेला. ज्यामुळे न्यूझीलंडने भारताविरुद्ध १०८ धावांची आघाडी घेतली आहे.

Story img Loader