टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या संघाने न्यूझीलंडला अवघ्या १०८ धावांत गुंडाळले. पाठलाग करताना टीम इंडियाने २१ व्या षटकातच विजय मिळवला. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने दुसऱ्या वनडेत शानदार गोलंदाजी केली. त्याने न्यूझीलंडच्या ३ खेळाडूंना पॅव्हेलियमध्ये पाठवले. या ३ विकेट्ससह, शमीने आपल्या नावावर दोन विक्रमांची नोंद केली.

सर्वाधिक वेळा ३ विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज –

शमीने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६ षटके टाकताना न्यूझीलंडच्या ३ खेळाडूंना बाद केले. त्याने पहिल्यांदा फलंदाज फिन ऍलनला बाद केले. त्यानंतर डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेलच्या विकेट घेतल्या. त्याने २९व्यांदा वनडे क्रिकेटमध्ये तीन विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. हे करत तो टीम इंडियासाठी सर्वाधिक वेळा ३ विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे.

अजित आगरकरने टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ३ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने ३८ वेळा ३ विकेट्स घेतल्या आहेत. जवागल श्रीनाथ दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ३७ वेळा ३ विकेट्स घेतल्या आहेत. झहीर खान (३१ वेळा) तिसऱ्या स्थानावर आहे. मोहम्मद शमी आणि अनिल कुंबळे यांनी २९ वेळा ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा – IND vs NZ: ‘तो मिनी रोहित शर्मा वाटतो’; युवा भारतीय फलंदाजाचे कौतुक करताना रमीझ राजा म्हणाले

वनडे सर्वाधिक विकेट्स घेणारा १० वा भारतीय गोलंदाज –

हेही वाचा – IND vs NZ ODI: तिसऱ्या सामन्यापूर्वी जाफरचा विराट-रोहितला महत्वाचा सल्ला; म्हणाला, ‘तुम्ही कितीही अनुभवी असला…’

मोहम्मद शमीने या ३ विकेट्स घेताना आणखी एक विक्रम केला आहे. तो वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा १० गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद शमीच्या नावार वनडे क्रिकेटमध्ये ८७ सामन्यात १५९ विकेट्स आहेत. या यादीत अनिल कुंबळे अव्वल स्थानी आहे. त्यानी २६९ सामन्यात ३३४ विकेट्स घेतल्या आहेत.