IND vs NZ Mohammed Siraj Devon Conway Banter: न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघ बॅकफूटवर आहे. पहिला दिवस पावसामुळे रद्द झाला. पण दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारा भारतीय संघ केवळ ४६ धावा करत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने चांगली सुरुवात करून भारताला विकेट्स मिळवण्यासाठी फारच तंगवले. यादरम्यान मोहम्मद सिराज आणि डेव्हॉन कॉन्वे यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

न्यूझीलंड संघाकडून कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे ही जोडी सलामीसाठी उतरली. कॉन्वे सुरूवातीपासूनच चांगली फटकेबाजी करत होता. त्याने झटपट धावफलकावर धावा जोडण्यास सुरूवात केली. तर दरम्यान भारतीय संघदेखील विकेट मिळवण्याच्या प्रयत्नात होता. याचदरम्यान मोहम्मद सिराज आणि डेव्हॉन कॉन्वे यांच्यात जुंपली.

IND vs BAN 3rd T20I Sanju Samson credited captain Suryakumar Yadav and coach Gautam Gambhir
IND vs BAN : ‘मी खूप वेळा अपयशी ठरलो आहे पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनच्या प्रतिक्रियेने टीम इंडियासह चाहत्यांची जिंकली मनं
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Border Gavaskar Trophy Sanjay Manjrekar statement on Virat Rohit
विराट-रोहितचा काळ गेला, आता ‘हा’ खेळाडू भारताचा सर्वोत्तम खेळाडू; Border Gavaskar Trophy पूर्वी संजय मांजरेकरांचं वक्तव्य
Rohit Sharma Stops Car on Mumbai Busy Road and Wishes Female Fan on Her Birthday Video Goes Viral
Rohit Sharma: रोहित शर्माने चाहतीच्या वाढदिवसाचा आनंद केला द्विगुणित; दिली खास भेट; VIDEO व्हायरल
India vs Bangladesh 1st T20 Match highlights
IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने फडकावली विजयी पताका, बांगलादेशचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा
IND vs BAN 1st T20 Match Updates in Marathi
IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली कोणाकोणाला मिळणार संधी? जाणून घ्या भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
Morne Morkel Unhappy on Hardik Pandya Bowling
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण
Pakistan test captain Shan Masood on Virat Kohli
VIDEO : ‘विराटपेक्षा ‘या’ २४ वर्षीय खेळाडूचा रेकॉर्ड चांगला…’, पाकिस्तानच्या कसोटी कर्णधाराचे वक्तव्य

हेही वाचा – Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?

न्यूझीलंडच्या डावाच्या १५व्या षटकात सिराजकडे चेंडू होता. या षटकात कॉन्वेने सिराजच्या चेंडूवर चौकार लगावला. चौकार मारल्यानंतर सिराज रागावला आणि पुढच्या चेंडूवर कॉन्वेला काहीतरी म्हणाला, ज्याला कॉन्वेनेही उत्तर दिले. कॉनवे हा कायमच एक अतिशय शांत खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि इथेही त्याने फारशी प्रतिक्रिया दिली नाही. सोशल मिडियावर यांच्या वादाचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सिराज आणि कॉन्वे यांच्यातील वादाच्या वेळी सुनील गावसकर कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित होते ते म्हणाले, “आता तो डीएसपी आहे हे विसरू नका. मला आश्चर्य वाटतंय की त्याच्या सहकाऱ्यांनीही त्याला सॅल्यूट केला असेल का?” भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला काही दिवसांपूर्वी तेलंगणा सरकारने पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून नियुक्त केले आहे.

हेही वाचा – RSAW vs AUSW: बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत दाखल, आफ्रिकन संघाने घेतला मोठा बदला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अचानक चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियममध्ये CSK आणि RCB संघाच्या घोषणांचा ऐकू येऊ लागल्या होत्या. चिन्नास्वामी स्टेडियम हे आरसीबीचे होम ग्राउंड आहे. मोहम्मद सिराज आणि विराट कोहली आरसीबीकडून खेळतात आणि भारतीय कसोटी संघाचा भाग आहेत. तर डेव्हॉन कॉन्वे हा चेन्नई सुपर किंग्स संघाचा महत्त्वाचा भाग आहे. तर डॅरिल मिचेलही चेन्नई संघाचा भाग आहे.

हेही वाचा – IND vs NZ: भारताच्या वाताहतीला ‘हे दोन’ निर्णय कारणीभूत, रोहित शर्माच्या निर्णयाचा बसला मोठा फटका, तर विराट…

कॉनवेने कर्णधार टॉम लॅथमच्या (१५) साथीने पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केल्याने न्यूझीलंडची दमदार सुरुवात झाली. यानंतर विल यंगबरोबर (३३) कॉन्वेने ७५ धावांची भागीदारी केली. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने लॅथमला त्याच्या गोलंदाजीवर पायचीत करताना भारताला पहिले यश मिळवून दिले. तर रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकून कॉनवेने ५४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण अखेरीस अश्विनच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप करताना तो क्लीन बोल्ड झाला.