IND vs NZ Highest single day Test score in India : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणारा पहिला कसोटी सामना आता अतिशय मनोरंजक टप्प्यात पोहोचला आहे. आतापर्यंत तीन दिवस उलटून गेले आहेत, पण सामन्यात फक्त दोन दिवसांचा खेळ पार पडला आहे. कारण पावसामुळे पहिल्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. एकेकाळी टीम इंडिया बॅकफूटवर असल्याचे दिसत होते, पण त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने दमदार पुनरागमन केले. प्रथम रोहित-यशस्वी या सलामी जोडीने दमदार सुरुवात करुन दिली. यानंतर सर्फराझ-विराटने तिसरा दिवस मार्गी लावला. पण विशेष बाब म्हणजे आज बगळुरूमध्ये जे घडले, ते यापूर्वी कधीही घडले नव्हते. म्हणजे भारतीय भूमीवर इतिहास लिहिला गेला आहे.

बंगळुरूमध्ये आज भारत आणि न्यूझीलंडने केल्या ४५३ धावा –

सर्वप्रथम, त्या विक्रमाबद्दल बोलू, जो भारतात पहिल्यांदाच घडला आहे. खरे तर, जेव्हापासून भारतात कसोटी सामने सुरू झाले, तेव्हापासून एका दिवसात सर्वाधिक ४७० धावा केल्या गेल्या आहेत. आज इतक्या धावा झाल्या नाहीत, पण दुसऱ्या क्रमांकाच्या धावा नक्कीच झाल्या. पण २००९ मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात ४७० धावा झाल्या होत्या, तेव्हा तो कसोटीचा दुसरा दिवस होता. पण आज बंगळुरू येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटीत झालेल्या ४५३ धावा कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पूर्ण झाल्या आहेत. म्हणजेच ही भारताची तिसऱ्या दिवसाची सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांनी यामध्ये योगदान दिले आहे.

कानपूरचा विक्रमही काही दिवसांतच मोडला –

याआधी नुकताच टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध कानपूरमध्ये सामना खेळत असताना भारत आणि बांगलादेशने मिळून ४३७ धावा केल्या होत्या. हा विक्रम सामन्याच्या चौथ्या दिवशी झाला होता. आता तो विक्रमही मोडीत निघाला आहे. म्हणजेच भारतात दोन बॅक टू बॅक मॅचेसमध्ये नवे रेकॉर्ड तयार नोंदवले गेले आहेत. याआधी भारतात कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सर्वात मोठी धावसंख्या २०१३ मध्ये नोंदवली गेली होती. तेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मोहाली येथे झालेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांनी ४१८ धावा केल्या होत्या. अशाप्रकारे तिसऱ्या दिवशीच्या सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम जवळपास ११ वर्षे जुना होता.

हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीने घडवला इतिहास! भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

भारतात एका दिवसाच्या खेळात सर्वाधिक धावांची नोंद –

  • ४७० – भारत विरुद्ध श्रीलंका, ब्रेबॉर्न, २००९ ( दुसरा दिवस )
  • ४५३ – भारत विरुद्ध न्यूझीलंड, बंगळुरू, २०२४ ( तिसरा दिवस )
  • ४३७ – भारत विरुद्ध बांगलादेश, कानपूर, २०२४ (चौथा दिवस )
  • ४१८ – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मोहाली, २०१३ (तिसरा दिवस)
  • ४१७ – भारत विरुद्ध श्रीलंका, कानपूर, २००९ (पहिला दिवस)
  • ४०७ – भारत विरुद्ध बांगलादेश, इंदूर, २०१९ (दुसरा दिवस )

हेही वाचा – IND vs NZ : रोहित शर्माने सलामीवीर म्हणून केला मोठा पराक्रम! विराटच्या साथीने मोडला गांगुली-द्रविडचा विक्रम

तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर भारताला मोठा धक्का –

आता या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने चांगले पुनरागमन केले होते. पण तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहली बाद झाल्यामुळे संपूर्ण खेळाचा शेवट गोड होऊ शकला नाही. भारतीय संघाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद २३१ धावा केल्या आहेत. विराट कोहलीला शेवटच्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सने बाद केले. यामुळे टीम इंडियाच्या सामना जिंकण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. कोहलीने १०२ चेंडूत ७० धावांची शानदार खेळी केली. मात्र, सर्फराझ खान ७० धावा करूनही नाबाद आहे.