भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिलने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, पदार्पणाच्या सामन्यात त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही त्यामुळे तो निराश झाला होता. त्याला निराश झालेले पाहून माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातील कामगिरीचा उल्लेख करत त्याचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. अलीकडेच एका कार्यक्रमा दरम्यान शुबमनने धोनी काय बोलला याचा खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुबमन गिलने २०१९ साली एकदिवसीयमध्ये पदार्पण केले

२०१९ मध्ये शुबमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले. त्या सामन्यात, गिल केवळ ९ धावा करून बाद झाला आणि संपूर्ण संघ केवळ ९२ धावा करू शकला, जो न्यूझीलंड संघाने केवळ १४.४ षटकात २ गडी गमावून पूर्ण केला. त्या सामन्यात ९ धावा करणारा गिल त्याच्या कामगिरीने खूप निराश झाला होता, त्यानंतर धोनीने जाऊन त्याला प्रोत्साहन दिले.

शुबमन गिलने सांगितले की, “स्वस्तात बाद झाल्यानंतर मी खूप निराश झालो होतो, पण त्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी माझ्याकडे आला. यादरम्यान टीम इंडियाच्या माजी कर्णधाराने माझ्याशी बोलून मला प्रोत्साहन दिले. यादरम्यान महेंद्रसिंग धोनीने शुबमन गिलसोबत त्याच्या पदार्पणाच्या सामन्याची कहाणी शेअर केली. खरे तर महेंद्रसिंग धोनीने शुबमन गिलला सांगितले की, माझे पदार्पण तुझ्यापेक्षा वाईट होते. यादरम्यान माहीने गिलसोबतच्या पदार्पणाशी संबंधित गोष्टी शेअर केल्या.”

महेंद्रसिंग धोनी माझ्याकडे आला आणि मला प्रोत्साहन दिले

विशेष म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २००४ साली बांगलादेशविरुद्ध पदार्पण केले होते. या सामन्यात धोनी एकही धाव न काढता तंबूत परतला. शुबमन गिल म्हणाला की, न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात १५ धावांवर बाद झाल्यानंतर मी खूप निराश झालो होतो, त्यावेळी मी १८-१९ वर्षांचा होतो, पण त्यानंतर महेंद्रसिंग धोनी माझ्याकडे आला आणि माझी हिम्मत अफझाई की. यादरम्यान, माजी भारतीय कर्णधाराने मला आठवण करून दिली की तो त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता.

हेही वाचा :   IND vs NZ 2nd T20: दुसरा टी२० सामनाही पावसामुळे रद्द होणार का? जाणून घ्या न्यूझीलंडचे हवामान पिच रिपोर्ट

टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे जिथे ते तीन टी२० आणि ३ एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. वरिष्ठ खेळाडूच्या अनुपस्थितीत, शुबमन गिलला स्वत:ला सिद्ध करण्याची उत्तम संधी आहे कारण पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक आहे आणि संघात स्थान मिळवण्याची शर्यत आधीच सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz my debut i was very nervous when mahendra singh dhoni encouraged a dejected shubman gill avw