IND vs NZ New Zealand elected to bat and India 3 changes : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात खेळला जात आहे, ज्यामध्ये न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये शुभमन गिल, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदरचे पुनरागमन झाले आहे, तर केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना वगळण्यात आले आहे. न्यूझीलंड संघातही एक बदल करण्यात आला आहे. या कसोटी मालिकेत भारत ०-१ ने पिछाडीवर आहे.
वॉशिंग्टन सुंदरचे तीन वर्षानंतर पुनरागमन –
न्यूझीलंड विरुद्धच्या पुणे कसोटी सामन्यासाठी टीम इंडियामध्ये दिसलेल्या तीन प्रमुख बदलांपैकी वॉशिंग्टन सुंदर एक आहे, जो मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तब्बल ३ वर्षांनंतर सुंदरचे कसोटी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. वॉशिंग्टन सुंदरने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या ६ डावात फलंदाजी करताना ६६.२५ च्या सरासरीने २६५ धावा केल्या आहेत, ज्यात तीन अर्धशतकांचाही समावेश आहे. गोलंदाजीत त्याने आतापर्यंत ४९.८३ च्या सरासरीने ६ विकेट्स घेतल्या आहेत.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, सर्फराP खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाश दीप.
हेही वाचा – Dilip Vengsarkar : दिलीप वेंगसकर ‘आर्मीत’ नसतानाही, त्यांचे सहकारी ‘कर्नल’ का म्हणायचे? जाणून घ्या
न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साऊदी, एजाझ पटेल, विल्यम ओ’रुर्के.