India vs New Zealand, ICC World Cup 2023: विश्वचषकाची उपांत्य फेरी सुरू होण्यापूर्वीच वानखेडे मैदानाच्या खेळपट्टीवरून वाद सुरू झाला आहे. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना खेळला जात आहे. दरम्यान, बीसीसीआयने सामन्यापूर्वी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. याआधी सामन्यात नवीन खेळपट्टी घेतली जाणार होती.

डेली मेलच्या वृत्तानुसार, आयसीसीचे खेळपट्टी सल्लागार अँडी अॅटकिन्सन यांनी सुरुवातीला वानखेडेच्या नवीन खेळपट्टीला मान्यता दिली होती, परंतु नंतर हा निर्णय बदलण्यात आला. या प्रकरणी भारतीय दिग्गज सुनील गावसकर म्हणाले, “ही खेळपट्टी सर्व संघांसाठी सामना संपेपर्यंत तशीच राहणार आहे, म्हणूनच मला वाटत नाही की खेळपट्टी कशी खेळेल किंवा काय होईल, यावर जास्त चर्चा व्हावी. मला विश्वास आहे की हा भारतीय संघ कोणत्याही खेळपट्टीवर सामना खेळण्यास पूर्णपणे सक्षम आहे. सर्वांनी या स्पर्धेत पाहिले आहे.”

ojas kulkarni of kolhapur participated in first world cup kho kh
ऑस्ट्रेलियन खो-खोची ‘ओजस्वी’ कहाणी! खेळ माहीत नसलेल्या देशाचा भारतीय ‘द्रोणाचार्य’
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
Jasprit Bumrah : Kapil Dev shoots down 1983 World Cup teammates controversial take on Bumrah's workload
Jasprit Bumrah : ‘बुमराहशी माझी तुलना करू नका…’, वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे वर्कलोड मॅनेजमेंटबाबत मोठं वक्तव्य
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
New Zealand announces 15 member squad led by Mitchell Santner for Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! केन विल्यमसन नव्हे तर ‘हा’ खेळाडू सांभाळणार धुरा

इंडिया टुडेशी बोलताना गावसकर पुढे म्हणाले, “जर ती कोरडी खेळपट्टी असेल, जी असण्याची शक्यता आहे, जर पाऊस नसेल येणार तर, तिथे ओलावा राहण्याची शक्यता नाही. खेळपट्टीवर थोडी फिरकी असण्याची शक्यता आहे. पण मुंबईची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजीसाठी चांगली असते. खेळपट्टी ही सर्वांसाठी सारखीच असते. म्हणूनच मला वाटत नाही की हा मुद्दा इथे लागू पडतो.”

हेही वाचा: IND vs NZ: डेव्हिड बेकहॅम, सलमानपासून ते नीता अंबानीपर्यंत भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी दिग्गजांची हजेरी; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

“फक्त स्तंभाची जागा भरायची आहे”- सुनील गावसकर

सुनील गावसकर यांनी भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले आणि म्हणाले, “आमच्याकडे ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, मला वाटत नाही की खेळपट्टी ही मोठी समस्या असेल. तुम्हाला सामन्याच्या पूर्वसंध्येला अशा बातम्या नेहमी वाचायला मिळतात. मला असे वाटते की हे सहसा घडते, जेव्हा तुमच्याकडे लिहिण्यासारखे काहीही नसते आणि मग तुम्ही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करता कारण, तुम्हाला स्तंभाची जागा भरायचा असते. मग कुठलेना कुठले कारण काढतात यावेळी त्यांनी खेळपट्टीचा मुद्दा काढला. मला काही फरक पडत नाही. जर नाणेफेकीनंतर खेळपट्टी बदलली असती तर आम्ही त्याबद्दल नक्कीच बोललो असतो. इथे खेळपट्टी नाणेफेकीपूर्वी जी होती तीच आहे. मला वाटत नाही की इथे कोणताही कारण असू नये.”

हेही वाचा: IND vs NZ सामन्याआधी शेवटच्या क्षणी वानखेडेमधील खेळपट्टी बदलल्याचा BCCI वर आरोप, नेमका वाद काय?

मायकेल वॉनने प्रतिक्रिया दिली

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने गावसकर यांच्या मताशी असहमती दर्शवली. उपांत्य फेरीसाठी नवीन खेळपट्टीचाच वापर व्हायला हवा, असे त्याचे मत आहे. वॉनने ट्वीट केले की, “विश्वचषक सेमीफायनल नव्या खेळपट्टीवर खेळली जावी. ही एक साधी बाब आहे.” मात्र, खेळपट्टीबाबत न्यूझीलंडकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Story img Loader