भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला शुक्रवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर तीन टी२० मालिका १-० ने जिंकल्यानंतर टीम इंडियाला एकदिवसीय मालिका जिंकायची आहे. पहिला एकदिवसीय सामना ऑकलंड येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना २७ नोव्हेंबरला हॅमिल्टनमध्ये आणि तिसरा सामना ३० नोव्हेंबरला क्राइस्टचर्चमध्ये खेळवला जाईल. टी२० मालिकेत हार्दिक पांड्याने संघाचे नेतृत्व केले होते. आता शिखर धवन एकदिवसीय मालिकेचीजबाबदारी सांभाळणार आहे. हार्दिक एकदिवसीय मालिकेत खेळणार नाही. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याच्याशिवाय संजू सॅमसन हा दुसरा यष्टिरक्षक आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल आणि माजी कर्णधार विराट कोहलीलाही विश्रांती देण्यात आली आहे.

भारत त्याच्या भूमीवर न्यूझीलंडविरुद्ध १०वी एकदिवसीय मालिका खेळणार आहे. याआधी टीम इंडियाला नऊ मालिकांमध्ये केवळ दोनदा यश मिळाले आहे. २००९ मध्ये, त्याने पाच एकदिवसीय मालिका ३-१ ने जिंकली. त्याच वेळी, २०१९ मध्ये समान संख्येने सामने खेळले गेले आणि भारत ४-१ ने विजयी झाला. न्यूझीलंडने पाच मालिका जिंकल्या आहेत आणि दोन अनिर्णित ठेवल्या आहेत.

भारतात टेलिव्हिजनवर टेलिकास्ट होईला का सामना?

भारत आणि न्यूझीलंड दौऱ्यावरील प्रत्येकी तीन सामन्यांची टी२० आणि एकदिवसीय सामन्यांचे मालिका डीडी स्पोर्ट्स शिवाय कुठल्याही टीव्ही चॅनलवर लाईव्ह टेलिकास्ट होणार नाहीये. भारतीय चाहत्यांसाठी डीडी स्पोर्ट्स हा एकमेव पर्याय आहे. अमॅझोन प्राईमवर लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

हेही वाचा :   IND vs NZ: शिखर धवनच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ न्यूझीलंडशी भिडणार, जाणून घ्या प्लेईंग-११

हवामान आणि खेळपट्टी अहवाल

टी२० मालिकेत पावसामुळे दोन सामन्यांची मजा काहीशी खराब झाली. उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान ऑकलंडमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. ऑकलंडमधील इतर दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी सामन्याच्या दिवशी हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पावसामुळे व्यत्यय येणार नाही. ऑकलंडमध्ये संध्याकाळी तापमान १६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेग ताशी १६ किमी असेल.

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: जपानने दिला जगाला शिस्तीचा धडा, जर्मनीवरील विजयानंतरच्या आनंदोत्सवातील ही कृती राहील लक्षात

ऑकलंडची खेळपट्टी ही नेहमीच फलंदाजीला पोषक राहिली आहे. मैदानाची बाजू या कमी असल्याने अधिक चौकार- षटकारांची आतिषबाजी उद्याच्या सामन्यात दोन्ही बाजूंकडून पाहायला मिळू शकते. पण हवामान जर कधी बदलले तर दोन्ही संघ हे धावांचा पाठलाग करण्यास प्रोत्साहन देतील.

Story img Loader