भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला शुक्रवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर तीन टी२० मालिका १-० ने जिंकल्यानंतर टीम इंडियाला एकदिवसीय मालिका जिंकायची आहे. पहिला एकदिवसीय सामना ऑकलंड येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना २७ नोव्हेंबरला हॅमिल्टनमध्ये आणि तिसरा सामना ३० नोव्हेंबरला क्राइस्टचर्चमध्ये खेळवला जाईल. टी२० मालिकेत हार्दिक पांड्याने संघाचे नेतृत्व केले होते. आता शिखर धवन एकदिवसीय मालिकेचीजबाबदारी सांभाळणार आहे. हार्दिक एकदिवसीय मालिकेत खेळणार नाही. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याच्याशिवाय संजू सॅमसन हा दुसरा यष्टिरक्षक आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल आणि माजी कर्णधार विराट कोहलीलाही विश्रांती देण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in