India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा समतोल बिघडला आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा पाचवा सामना न्यूझीलंडशी आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळले असून सर्व सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. हे असे दोन संघ आहेत ज्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. रविवारच्या सामन्यानंतर, एकच संघ असेल ज्याने आपले सर्व सामने जिंकले असतील आणि तो संघ गुणतालिकेत अव्वल असेल. अशा स्थितीत हा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

भारत आणि न्यूझीलंडचे संघ नक्कीच जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, पण दोन्ही संघ आपल्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहेत. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा हार्दिक पांड्या जखमी झाला होता. त्याचा पाय मुरगळला होता आणि या सामन्यासाठी तो संघासोबत धरमशालालाही पोहोचला नाही. नाणेफेकीदरम्यान कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “हार्दिकला बरे होण्यासाठी किमान आठवडा लागेल. हार्दिक हा असा खेळाडू आहे जो १० षटके टाकू शकतो आणि फलंदाजीही करू शकतो. अशा स्थितीत त्याच्या जागी कोणत्याही खेळाडूचा समावेश करणे कठीण होईल. जर हार्दिक संघात नसाल तर संघाचा समतोल साधने कठीण होते.”

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

भारतीय संघात समतोल साधण्यासाठी संघात दोन बदल करण्यात आले आहेत. हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तो फिनिशरच्या भूमिकेत असेल, जी आतापर्यंत हार्दिक बजावत होता. त्याचबरोबर गोलंदाजीत शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे. या स्थितीत भारताकडे जडेजाशिवाय सहा फलंदाज आहेत.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची दुखापत ही त्यांच्यासाठी समस्या आहे. विल्यमसनला आयपीएल २०२३मध्ये दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आणि तो विश्वचषकातील सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करताना त्याने अर्धशतक झळकावले, पण त्याच सामन्यात तो दुखापतग्रस्त होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. आता तो पुन्हा बराच काळ बाहेर आहे. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेला रचिन रवींद्रही शानदार फलंदाजी करत असून किवी संघ नियमित कर्णधार नसतानाही मोठ्या संघांना पराभूत करण्यात यशस्वी ठरला आहे.

हेही वाचा: IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी द्रविडने ICCला खेळपट्टीवरून दिले सडेतोड उत्तर; म्हणाला, “…तर गोलंदाज का खेळत आहेत?”

दोन्ही संघांची अशी आहे प्लेईंग-११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.