भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळत आहे. हा सामना ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेलने भन्नाट कामगिरी करत मोठा विक्रम रचला. त्याने एका डावात भारताच्या १० विकेट्स घेतल्या. यात रवीचंद्रन अश्विनच्याही विकेटचा समावेश होता. अश्विनची ही विकेट सर्वांच्या लक्षात राहिली.

मुंबई कसोटीदरम्यान दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघ अडचणीत सापडला. भारताने प्रथम वृद्धिमान साहा आणि अश्विनला ​गमावले. एजाजने अश्विनची दांडी गूल करत त्याला बाद केले. असे असूनही अश्विनने डीआरएस घेत सर्वांना थक्क केले. अश्विनच्या या निर्णयानंतर असे करता येईल का, अशी चर्चा सुरू झाली.

हेही वाचा – VIDEO : व्वा कॅप्टन..! न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला विराट कोहली अन् जिंकली सर्वांची मनं! वाचा कारण

अश्विन ७१.५ षटकांत फलंदाजीला आला आणि एजाजने त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. समोरून चेंडू स्विंग होऊन ऑफ-स्टंपवर आदळला. अश्विनने लगेच रिव्ह्यू घेण्याचे संकेत दिले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा कोणी क्लीन बोल्ड होतो, तेव्हा तो पंचांकडून निर्णय घेण्याचीही वाट न पाहता तंबूत परततो. पण अश्विनने मैदानावर उभे राहत चक्क रिव्ह्यू घेतला.

माजी समालोचक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी क्लीन बोल्ड झाल्यास रिव्ह्यू घेता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला. भारताचा सलामीवीर आकाश चोप्रा म्हणाला, ”अश्विनने रिव्ह्यू घेतला असेल, तर तो योग्य असेल. हा भारतीय खेळाडू असा आहे की ज्याने नियम वाचले आहेत. त्याला आयसीसीचे नियम चांगले माहीत आहेत आणि त्यामुळे रिव्ह्यू घेणे नक्कीच योग्य ठरेल.”

Story img Loader