ऑस्ट्रेलियातील टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर, शुक्रवारी वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार होता पण पावसामुळे तो रद्द करण्यात आला. भारत हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियममध्ये खेळला जाणार होता, मात्र पावसामुळे सामन्यात नाणेफेकही वेळेवर होऊ शकली नाही. शेवटी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी वेगळ्याच खेळाचा आनंद लुटला, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवा गडी नवा राज्य याप्रमाणे नवा कर्णधार, नवा उत्साह आणि भारतीय संघाच्या दृष्टीने भविष्यात टाकल्या जाणाऱ्या निर्णयांची आज पहिली परीक्षा होती. ती पावसामुळे होऊ शकली नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताची युवा ब्रिगेड न्यूझीलंडचा त्यांच्याच घरच्या मैदानावर सामना करणार आहे. पण, पावसामुळे या सामन्यात व्यत्यय निर्माण झाला आहे. वेलिंग्टनमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच नाणेफेकीला उशीर होतोय. त्यामुळे भारत-न्यूझीलंडचे खेळाडू फुटबॉल व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहेत.

पावसामुळे सामना काही काळ पुढे ढकलण्यात आला, त्यादरम्यान खेळाडूंना प्रतीक्षा करावी लागली. वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी खेळाडू आपापसात गेमिंगचा आनंद लुटताना दिसले. येथे भारत आणि न्यूझीलंडचे खेळाडू एकत्र व्हॉलीबॉल खेळताना दिसले. केन विल्यमसन, मोहम्मद सिराज, शुबमन गिल, संजू सॅमसन यांच्यासह अनेक खेळाडू व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि दोन्ही संघांची धमाल सुरूच आहे. आता भारत आणि न्यूझीलंडचे संघ २० नोव्हेंबरला मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यात आमनेसामने येतील. हा सामना माऊंट मौनगानुई येथे होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz rain interrupts india new zealand match players of both teams enjoy different games watch video avw