IND vs NZ Ravindra Jadeja cleverly run out William ORourke : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रोमांचक वळणावरा येऊन पोहोचला आहे. एकेकाळी न्यूझीलंडचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण भारताच्या गोलंदाजांने तिसऱ्या दिवशी सकाळी संघाचे शानदार पुनरागमन केले. दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा संघ केवळ २५५ धावा करू शकला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी ३५९ धावांचे लक्ष्य मिळाले. यादरम्यान भारतासाठी रवींद्र जडेजाने दमदार गोलंदाजी करताना एक उत्कृष्ट रनआऊट केला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाच्या फिरकी गोलंदाजीची जादू कामी आली. त्याने शानदार शैलीत न्यूझीलंडची शेवटची विकेट घेतली. वास्तविक किवी फलंदाज दोन धावा घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र जडेजाने आपल्या हुशारीने विल्यम ओ रुकला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. वास्तविक ७० व्या षटकांतील चौथ्या चेंडूवर किवी संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने मोठा फटका मारला, जो वॉशिंग्टन सुंदरने सीमारेषेच्या अगदी जवळ रोखला. मात्र, सुंदरने चेंडू उचलताना थोडी चलाखी केली, त्याने चेंडू सावकाश उचलला आणि जडेजाकडे पटकन फेकला, जे भारतीय दृष्टीकोनातून चांगले होते.

जडेजा-सुंदरच्या चुतराईने जिंकली चाहत्यांची मनं –

सुंदरला सुस्तपणे चेंडू उचलताना पाहून ग्लेन फिलिप्स आणि विल्यम ओ रूक या जोडीने दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न फसली. जडेजाने लगेचच सुंदरचा फेकलेला चेंडू पकडला आणि तो यष्टिवर सोडला. ज्यामुळे सुरुवातीच्या क्षणी वाटले की जडेजाने यष्टिवर सोडण्यापूर्वी फलंदाज क्रीजच्या आत पोहोचला आहे. मात्र, असा विचार करणाऱ्यांची निराशा झालेली दिसली, पण इथे फलंदाज बाद झाल्याचा कोहलीला पूर्ण विश्वास होता. यानंतर रिप्ले पाहिल्यावर समजले की फलंदाज क्रीजच्या आत पोहोचू शकला नाही. परिणामी विल्यमला रनआऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये जावे लागले आणि ग्लेन फिलिप्सला नाबाद ४८ परतावे लागले.

हेही वाचा – IND vs NZ : भारताला १२ वर्षांचा विजयरथ कायम राखण्याचे आव्हान, विजयासाठी न्यूझीलंडने दिले ३५९ धावांचे लक्ष्य

डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात २५९ धावा केल्या होत्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सात विकेट्स घेतल्या. यानंतर टीम इंडिया पहिल्या डावात १५६ धावांत आटोपली. अशाप्रकारे किवी संघाला पहिल्या डावाच्या जोरावर १०३ धावांची मोठी आघाडी मिळाली. आता दुसऱ्या डावात न्यूझीलंडने २५५ धावा केल्या असून भारताला ३५९ धावांचे लक्ष्य दिले आहे.

हेही वाचा – मोहम्मद शमीला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताच्या कसोटी संघातून का वगळले? जाणून घ्या

भारतीय गोलंदाजांची शानदार गोलंदाजी –

न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार टॉम लॅथमने सर्वाधिक ८६ धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे १७, विल यंग २३, रचिन रवींद्र ९ आणि डॅरिल मिशेल १८ धावा करून बाद झाले. टॉम ब्लंडेल (४१) आणि ग्लेन फिलिप्स (४८) यांच्यात सहाव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी झाली. मात्र तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी अवघ्या एका तासात पाच विकेट्स घेत न्यूझीलंडचा डाव गुंडाळल. मात्र, ग्लेन फिलिप्स ४८ धावांवर नाबाद परतला. दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने तीन, वॉशिंग्टन सुंदरने चार आणि रविचंद्रन अश्विनने दोन विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz ravindra jadeja cleverly run out william o rourke off washington sundar smart throw video has gone viral vbm