IND vs NZ Rohit Sharma in shock after unlucky bowled : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरु येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात ४६ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ४०२ धावा करत पहिल्या डावाच्या जोरावर ३५६ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. प्रत्युत्तरात रोहित-यशस्वी सलामी जोडीने भारताला दमदार सुरुवात करुन दिले. या डावात रोहित शर्मा पहिल्या डावातील उणीव भरुन काढताना दिसत होता. त्याने दमदार अर्धशतकही झळकावले होते. मात्र, यानंतर तो दुर्दैवी पणे आऊट झाला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित खूप नाराज झाल्याचा दिसला.

रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल –

भारताला दुसरा धक्का ९५ धावांवर बसला. चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेल्या कर्णधार रोहित शर्माने आपली विकेट गमावली. वास्तविक, भारताच्या दुसऱ्या २२ षटकात रोहितने एजाज पटेलच्या चेंडूचा बचाव केला. मात्र, चेंडू त्याच्या बॅटच्या तळाशी आदळला आणि मागे जाऊन विकेटवर आदळला. यावेळी रोहित स्टंपकडे जाणाऱ्या चेंडूला रोखू शकला नाही.

पहिल्या विकेटसाठी ७२ धावा जोडल्या –

अशाप्रकारे आऊट झाल्यानंतर रोहित खूपच निराश दिसत होता. त्याने ६३ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५२ धावांची खेळी साकारली. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे १८ वे अर्धशतक होते. रोहितने यशस्वी जैस्वालसह पहिल्या विकेटसाठी ७२ धावा केल्या होत्या. एजाज पटेलने यशस्वी जैस्वालला यष्टिरक्षक ब्लंडेलकरवी झेलबाद केले. त्याला ५२ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ३५ धावा करता आल्या.

हेही वाचा – IND vs NZ : टिम साऊदीने स्फोटक खेळीच्या जोरावर मोडला वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम, बंगळुरुमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम

रचिन रवींद्रने कसोटी क्रिकेटमधील दुसरे शतक झळकावून भारतीय संघामध्ये पराभवाची भिती निर्माण केली आहे. त्याच्या १३४ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावून ४०२ धावांची मोठी धावसंख्या उभारली. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या आधारे भारतावर ३५६ धावांची डोंगरासारखी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला डावाचा पराभव टाळायचा असेल, तर त्यांनी ही आघाडी तर घ्यावीच लागेल, शिवाय किमान एवढी मोठी धावसंख्याही उभारावी लागेल, जेणेकरून भारतीय सामना जिंकू शकेल किंवा अनिर्णित राहील.