IND vs NZ Semi Finals Match Updates 2023: भारत आणि न्यूझीलंड, आयसीसी विश्वचषक २०२३ उपांत्य फेरीच्या सामन्याच्या तयारीतील नाणेफेकीबद्दल रोहित शर्माला सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रश्न करण्यात आला होता.यावेळेस भारतीय कर्णधार म्हणाला की, “मागचे चार पाच सामने मला वानखेडे काय आहे हे सांगू शकत नाही पण मला असं खरोखर वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा घटक नाणेफेक नसेल. त्यामुळे आता नेमकी नाणेफेक श्रेष्ठ ठरते की टीम इंडिया हे आपल्याला लक्षात येईल पण तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकल्यास व गमावल्यास त्याचा काय परिणाम होऊ शकतो? वानखेडेवरील नाणेफेकीची भूमिका काय? याविषयी आपण थोडक्यात समजून घेऊया..

वानखेडेवर नाणेफेक काय भूमिका बजावू शकते?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान वगळता, आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये वानखेडेवर झालेल्या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना संघाने धावांचे मोठे आव्हान दिले आहे आणि ते राखून ठेवण्यातही यश आले आहे. अर्थात याला ग्लेन मॅक्सवेलने विक्रमी द्विशतक ठोकून ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानवर मिळवलेला विजय अपवाद आहे. सर्व सामन्यांची सरासरी काढल्यास वानखेडेवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ३५७ आहे. तर वानखेडेवर दुसऱ्या डावात फलंदाजीची सरासरी धावसंख्या ९ बाद १८८ आहे.

Rohit Sharma Statement on India Win and His Century in Cuttack IND vs ENG 2nd ODI
IND vs ENG: “इंग्लंडच्या गोलंदाजांनी माझ्या शरीराच्या दिशेने…”, रोहित शर्माचं शतकाबाबत मोठं वक्तव्य; भारताच्या विजयानंतर काय म्हणाला?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
IND vs ENG Rohit Sharma century helps India beat England by 4 wickets in the second ODI and won the series
IND vs ENG : भारताचा इंग्लंडवर सलग सातव्यांदा मालिका विजय, हिटमॅनची फटकेबाजी अन् जडेजाची फिरकी ठरली प्रभावी
Rohit Sharma Surpasses Sachin Tendulkar To Become Indias Second Leading Run Scorer As Opener
IND vs ENG: रोहित शर्माची ऐतिहासिक कामगिरी, सचिन तेंडुलकरचा मोडला विक्रम; मास्टर ब्लास्टरला मागे टाकत हिटमॅनने…
IND vs ENG Ravindra Jadeja surpasses Anil Kumble to become India second highest wicket taker in ODIs against England
IND vs ENG : रवींद्र जडेजाची सलग दुसऱ्या सामन्यात कमाल! अनिल कुंबळेला मागे टाकत ‘ही’ कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Shreyas Iyer Reveals How He Replaces Virat Kohli on Rohit Sharma Phone Call in India Playing XI
IND vs ENG: “मी रात्री चित्रपट बघत होतो अन् रोहितचा फोन…”, श्रेयस अय्यरने सांगितलं कसं झालं टीम इंडियात पुनरागमन, सामन्यानंतर काय म्हणाला?
IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले

भारताने नाणेफेक जिंकली तर

प्रथम फलंदाजी करताना सरासरी पॉवरप्ले स्कोअर १ बाद ५२ इतका अपेक्षित असतो तर धावांचा पाठलाग करताना, दुसऱ्या डावात ४ बाद ४२ असा होतो. त्यामुळे कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकल्यास टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करणे अपेक्षित आहे. न्यूझीलंडची दमदार वेगवान गोलंदाजी वानखेडेवर भारतीय सलामीवीर रोहित आणि शुबमन गिल यांची परीक्षा घेऊ शकते पण कर्णधार रोहितने संपूर्ण विश्वचषकात ५०३ धावा केल्या आहेत तर गिलने विश्वचषकातील काही सामने गमावल्यानंतरही २७० धावा केल्या आहेत. त्यामुळे या परीक्षेत ते उत्तीर्ण होऊ शकतील अशी आशा अजूनही करता येईल.

भारताला नाणेफेक गमवावी लागली तर..

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, हा विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, त्याने लीग टप्प्यात न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी ९५ धावांची शानदार खेळी केली होती. ९ सामन्यांत ५९४ धावा करणाऱ्या विराटची साथ भारतासाठी महत्त्वाची असेल. पण यजमानांनी नाणेफेक गमावल्यास, रोहित आणि कंपनीला न्यूझीलंडला कमी धावसंख्येपर्यंत रोखण्यासाठी भारताच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजीवर जास्त अवलंबून राहावे लागेल.

हे ही वाचा<< “ऐश्वर्या रायशी लग्न करून..”, माजी पाक खेळाडूची ‘हीन’ कमेंट, नेटकरी भडकले; आफ्रिदीची ‘ही’ कृती ठरली आगीत तेल

अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेत धर्मशाला येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचे आव्हान २७३ धावांत संपुष्टात आणले. शमीचा सहकारी जसप्रीत बुमराहने २०२३ विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक अशा १७ विकेट्स घेतल्या आहेत तर शमीच्या नावावर १६ विकेट्स आहेत. विश्वचषक स्पर्धेत १६ बळी घेणारा रवींद्र जडेजा २०२३ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध जरी विकेट्सचे खाते उघडू शकला नसला तरी तो सुद्धा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे नाणेफेक गमावून पहिल्यांदा गोलंदाजी घ्यावी लागली तरीही टीम इंडियाला ब्लॅक कॅप्सना जास्त धावा करण्यापासून रोखता येऊ शकते.

Story img Loader